मांत्रिक, देव्या, बाबांच्या नादी लागू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:34 IST2021-09-08T04:34:20+5:302021-09-08T04:34:20+5:30

सभेच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक अनिल दहागांवकर, ...

Don't follow the advice of magicians, goddesses, fathers | मांत्रिक, देव्या, बाबांच्या नादी लागू नका

मांत्रिक, देव्या, बाबांच्या नादी लागू नका

सभेच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक अनिल दहागांवकर, जिल्हा सचिव धनंजय तावडे, राजुरा तालुका संघटक धिरज मेश्राम यांची जादूटोणा, तंत्र-मंत्र, करणी, भूत-भानामती, देवी अंगात येणे, बुवाबाजी आणि जादूटोणाविरोधी कायदा आदी विषयांवर चमत्कार भंडाफोड प्रात्यक्षिकासह गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. खुळचट व अस्तित्वहीन अंधश्रद्धांच्या आहारी न जाता, जीवनात चिकित्सक वृत्ती व वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्याचे आवाहन केले. पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण यांनीही बुवा, बाबा, मांत्रिक, देव्या यांच्या नादी लागून गाव तसेच परिसरातील कायदा व सुव्यवस्था न बिघडवण्याचे आवाहन केले. सदर कार्यक्रमाला गावकऱ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Don't follow the advice of magicians, goddesses, fathers