महापुरुषांना एका समाजापुरते बंदिस्त करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:51 IST2021-02-21T04:51:50+5:302021-02-21T04:51:50+5:30

जिवती : महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी विचारांचे असे सक्षम राज्य आहे या राज्यात अनेक संत महात्मे,महापुरुष होऊन गेलेत आणि ...

Don't confine great men to one society | महापुरुषांना एका समाजापुरते बंदिस्त करू नका

महापुरुषांना एका समाजापुरते बंदिस्त करू नका

जिवती : महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी विचारांचे असे सक्षम राज्य आहे या राज्यात अनेक संत महात्मे,महापुरुष होऊन गेलेत आणि त्यांच्याच विचारांचा पगडा आजही राज्यात चालत आहे. समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता असे समाजाप्रती त्यांचे विचार आहेत. महापुरुषांना केवळ एका समाजाप्रती बंदिस्त करू नका, असे प्रतिपादन पुणे येथील संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते प्रा. गंगाधर बनबरे यांनी यावेळी केले.

येथील हनुमान मंदिर बसस्टॅंड चौक येथे शिवजयंतीचा पार पडला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अविनाश जाधव होते. उद्घाटक म्हणून केशव गिरमाजी, प्रमुख वक्ते म्हणून पुणे येथील संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते प्रा. बनबरे व प्राचार्य संभाजी वारकड होते. प्रमुख पाहुणे म्हणून पांडुरंग जाधव, पंचायत समिती सभापती अंजनाताई पवार, जिल्हा परिषद सदस्य गोदावरी केंद्रे, नगरपंचायत उपाध्यक्ष अशपाक शेख,नगरसेवक गजानन जुमनाके, नगरसेवक अमर राठोड,डॉ. अंकुश गोतावळे, सुरेश केंद्रे, सतलुबाई जुमनाके, महेबूब शेख, गोविंद टोकरे, गणपत आडे, दत्ता राठोड, सुदाम राठोड, वर्षा गुरमे, अश्विनी गुरमे यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक उत्तम कराळे, संचालन प्रा. पांडुरंग सावंत तर आभार बळीराम शेळके यांनी मानले.

Web Title: Don't confine great men to one society