डोंगरगावला संत तुकाराम महाराज पुरस्कार
By Admin | Updated: September 13, 2016 00:49 IST2016-09-13T00:49:24+5:302016-09-13T00:49:24+5:30
वनाचे संरक्षण, संवर्धन व संगोपनाचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने सिंदेवाही वनरिक्षेत्रातील डोंरगाव वनव्यस्थापन समितीला सन २०१४-१५ चा संत तुकाराम महाराज पुरस्कार घोषित केला.

डोंगरगावला संत तुकाराम महाराज पुरस्कार
सिंदेवाही : वनाचे संरक्षण, संवर्धन व संगोपनाचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने सिंदेवाही वनरिक्षेत्रातील डोंरगाव वनव्यस्थापन समितीला सन २०१४-१५ चा संत तुकाराम महाराज पुरस्कार घोषित केला.
नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, वनराज्यमंत्री अमिराव आत्राम यांच्या हस्ते वनसमितीला पुरस्कार प्रदान करण्यात आला. उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, सहाय्यक वनसंरक्षक ए. एस. मेश्राम, वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत कामडी यांनी गावाला भेटी देवून वनसंरक्षण व वन्यजीव संरक्षणाबाबत वनव्यवस्थापन समितीला वेळोवेळी मार्गदर्शन केले होते. पुरस्कारा मिळावा या दृष्टीने वनपाल बोढे, वनरक्षक गेडाम, पोलीस पाटील योगेश लोंढे, मोतीराम लेनगुरे, अध्यक्ष महेश नैताम, पुरुषोत्तम गावतुरे यांनी परिश्रम घेतले.