शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

कुणी मोबाईल देता का मोबाईल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:19 IST

४० टक्के ग्रामीण विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोनच नाही राजेश बारसागडे सावरगाव : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे शिक्षणाचा चेहरामोहरा बदलून गेला आहे. ...

४० टक्के ग्रामीण विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोनच नाही

राजेश बारसागडे

सावरगाव : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे शिक्षणाचा चेहरामोहरा बदलून गेला आहे. मागील वर्षी शाळा -महाविद्यालयातील शिक्षण ऑनलाइन सुरू होते. मात्र यातील केवळ ६० टक्के विद्यार्थ्यांपर्यंतच ऑनलाइन शिक्षण पोहचले. उर्वरित ४० टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्ट फोन नसल्याची माहिती पुढे आली आहे. नागभीड तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांकडे हलाखीची परिस्थिती असल्यामुळे स्मार्टफोनच नाही. ज्यांच्या घरी एक मोबाईल आहे त्याठिकाणी दोन मुले शिक्षण घेत आहेत, त्यांनाही अडचणी निर्माण झाल्या आहेत. एकंदरीत मागच्या वर्षीचे शिक्षण कसेबसे पूर्ण केले. यंदा पुन्हा ऑनलाइन शिक्षणाने शिक्षकांसह पालकांसमोरही मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी ‘कुणी मोबाईल देता काय मोबाईल’, असे म्हणण्याची वेळ आलेली आहे.

कोरोना संसर्गामुळे शाळा सुरू नसल्या तरी ऑनलाइन शिक्षण सर्वत्र सुरू आहे; परंतु निम्म्या विद्यार्थ्यांपर्यंतच ऑनलाइन शिक्षण पोहचत आहे. त्यातही ग्रामीण भागात मोबाईल शेतात आणि विद्यार्थी घरी अशी परिस्थिती आहे. परिसरातील नामांकित खासगी शाळा तसेच जिल्हा परिषद शाळेतून गृहपाठ तसेच सेतू अभ्यासक्रम शाळेचा वॉट्सॲप समूहावर पाठवून शिक्षण पूर्ण केले जात आहे. मात्र इतर विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाही, अशा विद्यार्थ्यांना अध्ययन करण्यासाठी अडचणी येत आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांकडे मोबाईल नसल्याने विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन शिक्षण पाठविणे अवघड जात आहे.

ऑनलाईन शिक्षणातील अडचणी

१. ग्रामीण भागातील पालकांकडे मोबाईल आहेत तर त्या भागात मोबाईलचे नेटवर्क नाही.

२. पालकांना दीक्षा ॲप व इतर माध्यमाची माहितीच नाही. शाळा बंद शिक्षण सुरू अशा अभ्यासमालेची माहिती नाही.

३. ग्रामीण भागात इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत होते.

४. ग्रामीण भागात बरेचदा विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने मोबाईलची बॅटरी पुरत नाही.

कोट

ग्रामीण भागातील बऱ्याच पालकांकडे स्मार्ट फोन नाहीत. तसेच ज्या पालकांकडे स्मार्टफोन (अँड्रॉइड मोबाईल) आहे, अशा ठिकाणी इंटरनेट सेवा पोहचत नाहीत. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण घेण्याकरिता विद्यार्थ्यांना अनेक अडचणी निर्माण होत आहेत.

-संतोष नन्नावार, उपक्रमशील शिक्षक, लोक विद्यालय तळोधी(बा), ता. नागभीड जि. चंद्रपूर

कोट :

इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत होत असते. तसेच आमच्या ग्रामीण परिसरात मोबाईलचे इंटरनेट नेटवर्क नेहमीच कमी असते. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण घेण्यास प्रचंड अडचणी येत आहेत.

- विनोद शेंडे, पालक,जनकापूर ता. नागभीड, जि. चंद्रपूर