कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी कुणी लस देता का लस..?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:28 IST2021-04-17T04:28:13+5:302021-04-17T04:28:13+5:30
कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसत आहेत. अशा संकटाच्या काळात प्राधान्य गटातील नागरिकांनी तातडीने प्रतिबंधक लस ...

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी कुणी लस देता का लस..?
कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसत आहेत. अशा संकटाच्या काळात प्राधान्य गटातील नागरिकांनी तातडीने प्रतिबंधक लस घ्यावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने १५ केंद्रांपासून १०४ केंद्रांपर्यंतचा जिल्हाभरात विस्तार केला. १ एप्रिल २०२१ पासून ४५ वर्षांच्या पुढील सर्व नागरिकांना लस देणे सुरू झाले. मात्र, मागणीएवढा पुरवठा होत नसल्याने लसीकरणात दर आठवड्यात खोडा निर्माण होत आहे. जिल्ह्यातील १०४ केंद्रांवर गुरुवारपर्यंत एक लाख ८० हजार ९३९ जणांनी लस घेतली. यामध्ये हेल्थ केअर व प्रन्ट लाईन वर्कर, ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवरील सर्वांचा समावेश आहे.
दोन लाख ७६ हजार डोसची मागणी
४५ वर्षांच्या सर्व नागरिकांना लस देणे सुरू असल्याने केंद्रांवर मोठी गर्दी वाढली आहे. चंद्रपूर मनपा क्षेत्रातही केंद्रांची संख्या वाढविण्यात आली. मात्र, मागील आठवड्यात शहराच्या वाट्याला केवळ तीन हजार डोस आल्याने दोन दिवसांत केंद्र बंद करावे लागले. जिल्हा प्रशासनाने आता पहिल्यांदाच दोन लाख ७६ हजार डोसची मागणी केली. त्यामुळे नेमके किती डोस मिळतात, याकडे आरोग्य अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.