मारोडा आरोग्य केंद्रात दोघांचा भार एक डॉक्टरच्या खांद्यावर
By Admin | Updated: March 18, 2015 01:12 IST2015-03-18T01:12:57+5:302015-03-18T01:12:57+5:30
येथील आरोग्य (प्राथमिक) केंद्रातील महिला वैद्यकीय अधिकारी मागील उन्हाळ्यात उच्च शिक्षणासाठी गेल्याने दोघांचा भार एकाच्या खांद्यावर पडलेला आहे.

मारोडा आरोग्य केंद्रात दोघांचा भार एक डॉक्टरच्या खांद्यावर
मारोडा : येथील आरोग्य (प्राथमिक) केंद्रातील महिला वैद्यकीय अधिकारी मागील उन्हाळ्यात उच्च शिक्षणासाठी गेल्याने दोघांचा भार एकाच्या खांद्यावर पडलेला आहे. तसेच भादुर्णी येथील महिला वैद्यकीय अधिकारी प्रसुती रजेवर गेल्याने रुग्णांना वेळेवर उपचार सुविधा मिळण्यास विलंब होत आहे.
या प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत एकूण पाच उपकेंद्र आहेत. यापैकी मुख्य ठिकाणी दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते परंतु येथील महिला वैद्यकीय अधिकारी सुमारे एक वर्षापूर्वी उच्च शिक्षणासाठी निघून गेल्यात. सध्या डॉ.प्रशांत वाघ हे वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. शासकीय सभा व इतर कामासाठी ते बाहेरगावी गेले की, राजगडवरुन डॉ.मीना मडावी किंवा तालुक्यातून डॉक्टर या ठिकाणी पाठविले जातात. भादुर्णीसारख्या दुर्गम भागात तर यापेक्षाही मोठी मोठी समस्या आहे.
तेथील महिला डॉक्टर प्रसुती रजेवर गेल्यात. त्यामुळे नोव्हेंबर २०१४ पासून तेथे निदान व उपचार नेमके कुणाकडून केले जात आहे, ही बाब गुलदस्त्यात आहे. याशिवाय इतर कोसंबी, चिंचाळा येथे तर ते पदच नाही. ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य सुविधा तातडीने मिळणे आवश्यक असूनही दोन रिक्त पदे अजुनही न भरल्याने लोकांना खासगी इस्पितळात जावे लागते. याकडे संबंधित विभागाने लक्ष पुरवावे, अशी जनतेची मागणी आहे. (वार्ताहर)