वयाच्या चाळीशीनंतर ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी लागणार डॉक्टरांचे प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 05:00 IST2021-08-18T05:00:00+5:302021-08-18T05:00:16+5:30
वयाची चाळीशी ओलांडणाऱ्यांना एमबीबीएस डॉक्टरांकडून ऑफलाईन वैद्यकीय प्रमाणपत्र द्यावे लागत होते. आता लायसन्स काढण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने फेसलेस सेवा सुरू केली. यांतर्गत घरबसल्या लर्निंग लायसन्स काढणे सोयीचे झाले आहे. त्यामुळे चाळीशी ओलांडलेल्या व्यक्तिंना लायसन्स काढायचे असेल किंवा नूतनीकरण करायचे असेल तर डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करावे लागणार आहे.

वयाच्या चाळीशीनंतर ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी लागणार डॉक्टरांचे प्रमाणपत्र
परिमल डोहणे
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वयाची चाळीशी गाठलेल्यांना वाहन परवाना काढण्यासाठी एमबीबीएस डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. पूर्वी हे प्रमाणपत्र ऑफलाईन सादर करायचे होते. मात्र, आता ऑनलाईन सादर कारावे लागणार आहे. त्यामुळे आता वयाच्या चाळीशीनंतर शारीरिकदृष्ट्या सुदृढ असलेल्यांनाच ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार आहे.
वाहनचालक हा वैद्यकीय व शारीरिकदृष्ट्या सक्षम असेल तरच तो व्यवस्थित वाहन चालवू शकतो. त्यामुळे वयाची चाळीशी ओलांडणाऱ्यांना एमबीबीएस डॉक्टरांकडून ऑफलाईन वैद्यकीय प्रमाणपत्र द्यावे लागत होते. आता लायसन्स काढण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने फेसलेस सेवा सुरू केली. यांतर्गत घरबसल्या लर्निंग लायसन्स काढणे सोयीचे झाले आहे. त्यामुळे चाळीशी ओलांडलेल्या व्यक्तिंना लायसन्स काढायचे असेल किंवा नूतनीकरण करायचे असेल तर डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करावे लागणार आहे. त्यासाठी त्यांना युजरआयडी व पासवर्ड देण्यात येणार आहे. त्यानंतर ते प्रमाणपत्र अपलोड करता येणार आहे. त्यामुळे चाळीशीनंतर शारीरिकदृष्ट्या सुदृढ असलेल्यांनाच ड्रायव्हिंग लायसन्स काढता येणार आहे किंवा नूतनीकरण करता येणार आहे.
लर्निंग लायसन्स ऑनलाईन
वाहन परवान्यासाठी नागरिकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अनेकदा फेऱ्या माराव्या लागतात. त्यातच दलालाकडून अतिरिक्त पैसे आकारले जात असल्याची ओरड नेहमीच होत असते. त्यामुळे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने फेसलेस सेवा सुरु केली. या सेवेतंर्गत चंद्रपूर जिल्ह्यात अडीच हजार ऑनलाईन लर्निंग लायसन्स काढण्यात आले आहे.
पूर्वीपासून चाळिशीनंतर परवाना काढायचा असल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक होते. परंतु, आता ते ऑनलाईन मागविण्यात येणार आहे. त्यासाठी लाॅगिन देण्यात येणार आहे. त्यानंतर अपलोड करावे लागणार आहे. ही प्रक्रीया अंडर प्रोसेस आहे.
-किरण मोरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर
किती वयापर्यंत मिळते लायसन्स
- वाहन चालवायचा परवाना घेण्यासाठी चालकांचे वय किमान १६ असणे गरजेचे आहे.
- कोणत्याही वयापर्यंत चालकाला लायसन्स काढता येते किंवा नुतनीकरण करता येते. परंतु, वयाच्या चाळिशीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र गरजेचे असते.
- अन्यथा लायसन्स काढताही येत नाही किंवा नुतनीकरण करता येत नाही.
एका डॉक्टरला दिवसाला २० प्रमाणपत्र देता येणार
पूर्वी आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथी डॉक्टरही हे प्रमाणपत्र द्यायचे. परंतु, यावर आक्षेप घेण्यात आल्यानंतर केवळ एमबीबीएस असलेल्या डॉक्टरांचेचे प्रमापत्र ग्राहृ्य धरले जाते.
एक डॉक्टर दिवसांतून केवळ २० जणांना परवान्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याची मुभा दिली आहे. आता ऑनलाईनच प्रमाणपत्र अपलोड करावे लागणार आहे.