टोलनाक्याविरोधात आमरण उपोषण सुरूच
By Admin | Updated: January 24, 2015 22:53 IST2015-01-24T22:53:00+5:302015-01-24T22:53:00+5:30
बल्लारपूर- चंद्रपूर या चौपदरी रस्त्यावरील विसापूर टोलनाका, बल्लारपूर शहर तथा संपूर्ण बल्लारपूर तालुक्यातील लहान-मोठ्या सर्व वाहनांना टोलमुक्त करा, या मागणीकरिता चंद्रपूर

टोलनाक्याविरोधात आमरण उपोषण सुरूच
बल्लारपूर: बल्लारपूर- चंद्रपूर या चौपदरी रस्त्यावरील विसापूर टोलनाका, बल्लारपूर शहर तथा संपूर्ण बल्लारपूर तालुक्यातील लहान-मोठ्या सर्व वाहनांना टोलमुक्त करा, या मागणीकरिता चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (औद्योगिक विभाग)चे जिल्हा अध्यक्ष संजय ढेंगर हे येथे तहसील कार्यालयासमोर २० जानेवारीपासून आमरण उपोषणावर बसले आहेत. त्यांच्या या उपोषणाला बल्लारपूर लोकल ट्रक ओनर असोसिएशन, बल्लारपूर सिटी क्लब क्रांतीकारी युवक क्लब बल्लारपूरयांनीी पाठिंबा दिला आहे. दोन टोलनाक्यांच्या अंतराच्या नियमाने ताडाळी नंतर विसापूर टोलनाका नकोच. त्यामुळे विसापूर टोलनाका तातडीने बंद करण्यात यावा, अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)