डीएनआर खासगी बसची पुलाला धडक
By Admin | Updated: April 6, 2016 00:42 IST2016-04-06T00:42:54+5:302016-04-06T00:42:54+5:30
नागपूर-चंद्रपूर मुख्य मार्गावरील आयुध निर्माणी गेट २ वर डीएनआर या खासगी बसच्या चालकाने नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्याकडेला पुलाला धडक बसली.

डीएनआर खासगी बसची पुलाला धडक
नऊ प्रवासी जखमी : आयुध निर्माणी गेटवरील घटना
भद्रावती : नागपूर-चंद्रपूर मुख्य मार्गावरील आयुध निर्माणी गेट २ वर डीएनआर या खासगी बसच्या चालकाने नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्याकडेला पुलाला धडक बसली. या अपघातात वाहकासह नऊ प्रवासी किरकोळ जखमी झाले. ही घटना मंगळवारी दुपारी ४.३० वाजता घडली.
नागपूर-चंद्रपूर मार्गे धावणारी डीएनआर कंपनीची बस एमएच- ३४ एआर- १६७७ ही नागपूर वरुन ४० प्रवाश्यांना घेऊन धावत होती. दरम्यान आयुध निर्माणी गेटवर सुमठानाजवळ गतिरोधक असल्याचे चालकाच्या लक्षात आले नाही. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले व बस रस्त्याच्या कडेला उतरुन येथील पुलाला धडक बसली. या अपघातात वाहकासह आठ प्रवासी जखमी झाले. मनहा शेख, नाजीम सलमान असे जखमींचे नाव असून इतर जखमींचे नाव मात्र कळू शकले नाही. जखमी प्रवाशांना चंद्रपूरच्या रूग्णालयात हलविण्यात आले. बस पलटी न झाल्याने मोठी जिवीत हानी टळली. बसचालकावर गुन्हा दाखल केला नव्हता. (शहर प्रतिनिधी)