डी.जे.चा हृदयाला त्रास
By Admin | Updated: October 25, 2016 00:43 IST2016-10-25T00:43:55+5:302016-10-25T00:43:55+5:30
डीजेच्या अतिआवाजाने व मोठ्या आवाजाच्या हादऱ्याने हृदयाला त्रास होतो, छाती दुखू लागते हे माहीत असूनही ...

डी.जे.चा हृदयाला त्रास
बल्लारपूर : डीजेच्या अतिआवाजाने व मोठ्या आवाजाच्या हादऱ्याने हृदयाला त्रास होतो, छाती दुखू लागते हे माहीत असूनही आणि मिरवणुकीत डीजेवर बंदी असूनही देवी विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजलाच! केवळ वाजलाच नाही तर चांगले हादरे देवून गेला. यामुळे लोकांना छातीत दुखू लागले. परिणामस्वरूप काही लोकांना डॉक्टरांकडे धाव घ्याव लागली, अशा तक्रारी सर्वत्र ऐकायला मिळत आहेत.
गणेश विसर्जनप्रसंगी काही अपवाद वगळता डीजे वाजला. पण बऱ्याच ठिकाणी त्याचा आवाज नियंत्रणात दिसला. देवी विसर्जनप्रसंगी मात्र त्यावर नियंत्रण फार कमी दिसले. काही मंडळांच्या डीजे आवाजाचे हादरे घाबरवून सोडणारे होते. या आवाजाचे हादरे घरावरील टिनांचे पत्रे, कौले यावर स्पष्टपणे दिसून येत होते. त्याचा त्रास ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना अधीक झाला. काही डीजेचा आवाज तर एवढा भयानक होता की, तो ऐकून कसा हा आवाज, असे म्हणण्याची व त्या आवाजापासून दूर जाण्याची धडपड सुरू होती. डॉक्टर मंडळींनीही डीजेवर नियंत्रण असायलाच हवे, त्याच्या मोठ्या आवाजाचे वाईट परिणाम लोकांना भोगावे लागतात असे म्हटले आहे. आवाजाने उत्सव साजरा करावा. पण त्याचा त्रास होणार नाही. प्रकृतीवर परिणाम होणार नाही, याची काळजी मंडळांनी घ्यायला हवी. पोलिसांचे ही त्याकडे दुर्लक्ष होते. नियंत्रणातून अधिक आवाज ठेवणाऱ्या डीजेवाल्यांवर दंडात्मक व त्वरित कारवाई व्हायला हवी, तरच हा अप्रकार बंद होणार, असे सार्वत्रिक मत आहे. (तालुका प्रतिनिधी)
आवाज नियंत्रणात ठेवा
पुढील महिन्यात नगर पालिकांच्या निवडणुका होत आहेत. चित्रपट कलावंतांचे रोड शो काढले जातील. तेथेही डीजे वाजला जाणार. त्याप्रसंगी तरी डीजेचा आवाज नियंत्रणात ठेवण्याची संबंधितांना आतापासूनच सूचना द्यायला हवी.