दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा

By Admin | Updated: February 14, 2017 00:35 IST2017-02-14T00:35:30+5:302017-02-14T00:35:30+5:30

स्व. गौरव पुगलिया स्मृती प्रीत्यर्थ आस्था बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्टतर्फे रविवारी दिव्यांग सामूहिक विवाह सोहळा झाला.

Divya Sangha's mass marriage ceremony | दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा

दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा

२१ जोडपी विवाहबद्ध : आस्था बहुउद्देशीय ट्रस्टचा उपक्रम
चंद्रपूर : स्व. गौरव पुगलिया स्मृती प्रीत्यर्थ आस्था बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्टतर्फे रविवारी दिव्यांग सामूहिक विवाह सोहळा झाला. यामध्ये २१ दिव्यांगबांधवांना परिणय सूत्रात बांधण्यात आले.
या सोहळ्यासाठी सकाळी सर्व वधू-वरांना सजविण्यात आले. ढोल-ताशांच्या निनादात वरात निघाली. त्यानंतर सर्व वर-वधूंनी देवी महाकालीचे दर्शन घेतले. त्यांचा विवाह सोहळा गौरव सेलिब्रेशन येथे पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार नरेश पुगलिया होते. याप्रसंगी अ‍ॅड. अनिल किल्लोर, राहुल पुगलिया, सिकवेरा, सुभाष शिंदे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात १० प्रशिक्षणप्राप्त दिव्यांगांना शिवणयंत्र भेट देण्यात आले. तसेच आपापल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या दिव्यांगांचा गौरव करण्यात आला. वधू-वरांना संसारोपयोगी साहित्यासह २५ हजार रुपये भेट स्वरूपात देण्यात आले. सोहळ्याच्या आयोजनाकरिता महावीर मानव सेवा संस्था, सेल्फ क्रिएशन, जय बजरंग क्रीडा प्रसारक मंडळ, चंद्रपूर बुद्धीजीवी संघटना, डेबू सावली वृद्धाश्रम यासह संस्थासह यशवंत देशमाने, विवेक पाटील, प्रकाश राजूरकर, अमोल मारोतकर, राखी बोराडे, मनीषा पडगिलवार, अविनाश गायधने, साबीया शेख, महेंद्र मंडलेचा, अमर गांधी, अशोक कोठारी, रतन गांधी, देवेनभाई शहा, मीना चोरडिया यांचे सहकार्य लाभल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष संजयकुमार पेचे यांनी दिली. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Divya Sangha's mass marriage ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.