जिल्हा शिवसेनेत खांदेपालट

By Admin | Updated: April 24, 2015 00:59 IST2015-04-24T00:59:06+5:302015-04-24T00:59:06+5:30

शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये फेरबदल करण्यासाठी मागील अनेक दिवसांपापासून सुरू असलेल्या हालचालींना गुरूवारी अखेर पूर्णविराम मिळाला.

District Shivsena, Khandipalat | जिल्हा शिवसेनेत खांदेपालट

जिल्हा शिवसेनेत खांदेपालट

चंद्रपूर : शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये फेरबदल करण्यासाठी मागील अनेक दिवसांपापासून सुरू असलेल्या हालचालींना गुरूवारी अखेर पूर्णविराम मिळाला. शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी मुंबईत केलेल्या घोषणेनुसार, नवे जिल्हाप्रमुख म्हणून अनिल धानोरकर आणि सतीश भीवगडे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. या सोबतच आमदार बाळू धानोरकर यांच्याकडे चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा संघटक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मागील विधानसभा निवडणुकांपासून शिवसेनेच्या जिल्हा नेतृत्वात फेरबदल करण्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यासाठी अनेकजण इच्छुक होते. अनेकांी यासाठी मुंबईत वाऱ्याही केल्या होत्या. मागील महिन्यात उद्धव ठाकरे चंद्रपुरात आले असता अनेकांनी आपल्या नावांची लॉबिंग करण्याचा प्रयत्न केला होता. विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपातून शिवसेनेत प्रवेशलेले किशोर जोरगेवार हे सुद्धा इच्छूक होते. त्यांच्यासाठी मातोश्रीवर मोठ्या प्रमाणात नाव चालविण्यात आले. शिवसेनेचे जुने नेते दिलीप कपूरही इच्छुकांच्या रांगेत होते. मात्र या नावांना डावलून उद्धव ठाकरे यांनी दोन्ही नवीन नावांना प्राधान्य दिल्याची माहिती आहे.
धानोरकरांचे वर्चस्व
नव्या कार्यकारिणीमध्ये आमदार बाळू धानोरकर यांचे वर्चस्व राहण्याची अधिक शक्यता आहे. मुंबईतून जाहीर झालेल्या नावांमध्ये जिल्हाप्रमुख म्हणून निवड झालेले अनिल धानोरकर हे बाळू धानोरकर यांचे बंधू असून भद्रावती नगर पालिकेचे नगराध्यक्ष आहेत. तर लोकसभेची जबाबदारी खुद्द बाळू धानोरकर यांच्याकडे आली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: District Shivsena, Khandipalat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.