जिल्हा नियोजन समितीची खर्चाला मंजुरी

By Admin | Updated: May 27, 2014 23:35 IST2014-05-27T23:35:33+5:302014-05-27T23:35:33+5:30

जिल्हा वार्षिक योजना २0१३-१४ च्या खर्चास मंगळवारी जिल्हा नियोजन समितीने मंजुरी प्रदान केली. सर्वसाधारण योजना, आदिवासी उपयोजना, ओटीएसपी व अनुसूचित जाती उपाययोजना

District Planning Committee approved the expenditure | जिल्हा नियोजन समितीची खर्चाला मंजुरी

जिल्हा नियोजन समितीची खर्चाला मंजुरी

चंद्रपूर : जिल्हा वार्षिक योजना २0१३-१४ च्या खर्चास मंगळवारी जिल्हा नियोजन समितीने मंजुरी प्रदान केली. सर्वसाधारण योजना, आदिवासी उपयोजना, ओटीएसपी व अनुसूचित जाती उपाययोजना या चारही योजना मिळवून मार्च २0१४ अखेर ९७ टक्के खर्च झाला. पावसाळ्यापूर्वी गावपातळीवर ग्रामपंचायतीतर्फे नाल्यांची त्वरीत सफाई करण्याचे निर्देश पालकमंत्री संजय देवतळे यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष संतोक कुमरे, आमदार शोभाताई फडणवीस, नाना श्यामकुळे, अतुल देशकर, विजय वडेट्टीवार, अपर जिल्हाधिकारी सी.एस. डहाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील व अशासकीय सदस्य उपस्थित होते.

सन २0१३-१४ या वर्षात सर्वसाधारण योजना १३५ कोटी ९९ लाख ५0 हजार, आदिवासी उपयोजना ८३ कोटी २७ लाख, ओटीएसपी ३३ कोटी ३९ लाख ८४ हजार व अनुसूचित जाती उपयोजना ४६ कोटी २३ लाख ६२ हजार असा एकूण २९८ कोटी ८९ लाख ९६ हजार खर्च झाला. खर्चाची टक्केवारी ९७.३७ टक्के एवढी आहे. या खर्चाला अध्यक्ष व समिती सदस्यांनी मंजुरी प्रदान केली.

जिल्हा वार्षिक योजना २0१४-१५ चा नियोजन आराखडा मंजूर झाला असून कामांचे प्रस्ताव तयार करून संबंधित विभागाने तातडीने मान्यता घ्यावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. चालू आर्थिक वर्षात कोणत्याही विभागाचा निधी शिल्लक राहणार नाही, अशा प्रकारचे सर्व विभाग प्रमुखांनी नियोजन करावे असेही त्यांनी सांगितले. या बैठकीत जिल्ह्यात जिल्हा परिषदेतर्फे सन २0१४-१५ चा मागासक्षेत्र अनुदान निधीचा प्रारुप आराखड्याबाबत चर्चा करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: District Planning Committee approved the expenditure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.