----
आयएमए चंद्रपूर
चंद्रपूर : आयएमएचचे अध्यक्ष डाॅ. अनिल माडूरवार यांच्या हस्ते आएएमए हाॅल येथे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सचिव डाॅ. सुरभी मेहरा यांच्यासह डाॅक्टरांची उपस्थिती होती. याप्रसंगी चित्रकला, निबंध स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर पारितोषिक वितरण करण्यात आले. आभार डाॅ. सुधीर रेगुंडवार यांनी मानले. डाॅ. सुनील संघई यांनी सोशल सेक्युरिटी स्कीमबाबतच माहिती दिली.
---
राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय
चंद्रपूर : राजीव गांधी अभियांत्रक्षिकी महाविद्यालायात सरदार पटेल मेमोरिअल ट्रॅस्टचे अध्यक्ष शफिक अहमद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सुधाकर चकनलवार, जयंत वलकींवार आदींची उपस्थिती होती. यावेळी प्राचार्य डाॅ.झेड.जे. खान, प्रा. राजेश भुते यांच्यासह प्राध्याक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. आयोजनाकरिता विनोद धनंजये, संजय फुलझेले, राजेश हजारे आदींनी सहकार्य केले.