ग्रामपंचायत बोरगावला जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:28 IST2021-08-15T04:28:27+5:302021-08-15T04:28:27+5:30

जिल्ह्यात रमाई आवास योजना अंतर्गत बोरगाव ग्रामपंचायतने शंभर टक्के घरकुल योजनेत सहभागी होऊन उद्दिष्टे पूर्ण केली असल्याने हा प्रथम ...

District level first award to Gram Panchayat Borgaon | ग्रामपंचायत बोरगावला जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार

ग्रामपंचायत बोरगावला जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार

जिल्ह्यात रमाई आवास योजना अंतर्गत बोरगाव ग्रामपंचायतने शंभर टक्के घरकुल योजनेत सहभागी होऊन उद्दिष्टे पूर्ण केली असल्याने हा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. यासाठी संवर्ग विकास अधिकारी यांचे वेळोवेळी योग्य मार्गदर्शन, घरकूल विभागातील सर्व कर्मचारी तसेच सचिव ग्रामपंचायत बोरगाव यांचा या पुरस्कार करिता मोलाचा वाटा आहे. त्याच प्रमाणे मागील सहा ते सात वर्षांपासून घरकूलापासून वंचित असलेले ग्रामपंचायत चौगान, एकरा, रुई व बोडधा यासाठी वेळोवेळी वरिष्ठ कार्यालयात पाठपुरावा करून तेथील लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्याकरिता पंचायत समिती ब्रम्हपुरीला यश आलेले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी यांनी जिल्ह्यात स्वच्छ कार्यालय स्पर्धा आयोजित केली आहे. त्या स्पर्धेत ब्रम्हपुरी पंचायत समिती चांगले काम करून पुरस्कार प्राप्त करेल, असा आशावाद या पुरस्काराच्या निमित्ताने संवर्ग विकास अधिकारी डॉ. शिरीष रामटेके यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: District level first award to Gram Panchayat Borgaon