जिल्हा मुख्यालयी क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना होणार

By Admin | Updated: May 27, 2014 00:44 IST2014-05-27T00:44:38+5:302014-05-27T00:44:38+5:30

राज्य शासनाने २०१२ मध्ये जाहीर केलेल्या राज्याच्या क्रीडा धोरणातंर्गत शिफारशीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील क्रीडापटूंच्या गुणांना चालना देण्यासाठी जिल्ह्यामध्ये जिल्हा क्रीडा

District Headquarter Sports Training Center will be established | जिल्हा मुख्यालयी क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना होणार

जिल्हा मुख्यालयी क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना होणार

चंद्रपूर : राज्य शासनाने २०१२ मध्ये जाहीर केलेल्या राज्याच्या क्रीडा धोरणातंर्गत शिफारशीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील क्रीडापटूंच्या गुणांना चालना देण्यासाठी जिल्ह्यामध्ये जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यास शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मान्यता प्रदान केली आहे. यासंदर्भात शासनाच्या वतीने परिपत्रक निगर्मित करण्यात आले आहे. या जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रातून शहरी, ग्रामीण भागातील उद्योन्मुख खेळाडूंना अद्यावत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याक्रीडा प्रशिक्षण केंद्रास नियमितपणे आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. क्रीडा प्रशिक्षण केंद्रातून क्रीडा वाङमय सीडी, पुस्तके, नियतकालीके उपलब्ध करून दिल्या जातील वर्षातून किमान दोनवेळा चर्चासत्र, परिसंवाद घेऊन खेळाडूंना मार्गदर्शन केल्या जाणार आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी अनुदानाच्या प्रस्तावाची छाणणी करतील. अनुदान मंजुरीचे अधिकार क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आयुक्तांना राहणार आहेत. राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण आवश्यक आहे. हे जाणून क्रीडा धोरण जाहीर करणारे, महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. खेळाच्या पुरेशा सुविधा निर्माण करण्यासाठी राज्याने पुढाकार घेतलेला आहे. राज्य क्रीडा क्षेत्रात अग्रगण्य रहावे, नागरिकांमध्ये व्यायामाचे आवड जोपासावी, राज्यातील खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार क्रीडा सुविधा विषयक तंत्रशुद्ध प्रशिक्षण खेळाच्या दर्जात सुधारणा, खेळाडूंना गौरव, दर्जेदार क्रीडा सुविधा या बाबी केंद्रबिंदू मानून खेळाडूंसाठी हितावह योजना राज्यात राबविण्यासाठी क्रीडा धोरण २०१२ तयार करण्यात आलेले आहे. त्याची अंमलबजावणी करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित झाला आहे. त्यातील शिफारशीच्या अनुषंगाने राज्यातील क्रीडापटूंच्या गुणांना वाव मिळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे क्रीडा क्षेत्राचा विकास होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: District Headquarter Sports Training Center will be established

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.