म.रा.शिक्षक परिषदेचे जिल्हा अधिवेशन
By Admin | Updated: January 17, 2016 00:57 IST2016-01-17T00:57:12+5:302016-01-17T00:57:12+5:30
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चंद्रपूरचे जि.प. खासगी, अनुदानित, विनाअनुदानित, कॉन्व्हेंट, आश्रमशाळा, प्राथमिक शाळा, व उच्च माध्यमिक, प्राचार्य,...

म.रा.शिक्षक परिषदेचे जिल्हा अधिवेशन
आज उद्घाटन : विविध विषयांवर होणार विचार मंथन
भद्रावती : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चंद्रपूरचे जि.प. खासगी, अनुदानित, विनाअनुदानित, कॉन्व्हेंट, आश्रमशाळा, प्राथमिक शाळा, व उच्च माध्यमिक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याचे संयुक्त जिल्हा अधिवेशनाला शनिवारपासून लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात प्रारंभ झाला.
शनिवारी सायंकाळी शिक्षकांच्या समस्या व त्यावरील उपाय हा कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी म.रा.शि.प.चे जिल्हाध्यक्ष मधूकर मुप्पीडवार व प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा कार्यवाह रामदास गिरडकर उपस्थित होते. १७ जानेवारीला सकाळी ८.३० वाजता बलशाली संघटनेची गरज यावर चर्चा होणार असून अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष हरिभाऊ गरफडे वक्ते म्हणून कार्याध्यक्ष प्राचार्य विनोद पांढरे तर शासनाचे धोरण व संघटनेची भूमिका या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हाध्यक्ष वासुदेर खाडे व वक्ते म्हणून विभाग अध्यक्ष डॉ. उऱ्हास फडके उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटन सोहळा १७ ला सकाळी ११ वाजता होणार असून उद्घाटक म्हणून वित्त तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. उल्हास फडके, स्वागताध्यक्ष लोकसवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, प्रमुख अतिथी आ. नागो गाणार, आमदार बाळू धानोरकर, राज्य सहकार्यवाह वातकर, राज्य महिला आघाडी प्रमुख पूजा चौधरी, विजय मुडे, विभाग कार्यवाह सुहास काकपुरे, शिक्षणाधिकारी (माध्य.) संजय डोर्लीकर उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी ४ वाजता खुले अधिवेशन होणार असून अध्यक्ष म्हणून जिल्हा कोषाध्यक्ष गजानन शेळके व वक्ते उपाध्यक्ष म्हणून राजेंद्र मोहितकर उपस्थित राहतील.शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)