जिल्हा ग्राहक संरक्षण सदस्यांची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 23:06 IST2018-03-20T23:06:53+5:302018-03-20T23:06:53+5:30
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच अध्यक्ष उमेश जावळीकर यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक ग्राहक दिनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला.

जिल्हा ग्राहक संरक्षण सदस्यांची घोषणा
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच अध्यक्ष उमेश जावळीकर यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक ग्राहक दिनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन, सहा.जिल्हा पुरवठा अधिकारी के. वाय. कुणारपवार, जिल्हा ग्राहक तक्रार न्यायमंच सदस्य कीर्ती गाडगीळ, कल्पना जांगळे, आशिष कोत्तावार, सुधीर मिसाळ आदी उपस्थित होते.
यावेळी ग्राहकांच्या जागृतीकरिता अन्न व औषध प्रशासन विभाग चंद्रपूर वैध मापन विभाग चंद्रपूर, खांडरे गॅस एजंन्सी चंद्रपूर यांच्याकडून प्रदर्शन आयोजन करण्यात आले. शासकीय समिती सदस्य म्हणून जिल्हाधिकारी अध्यक्ष, जिल्हा पोलीस अधीक्षक सदस्य, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सदस्य, सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन सदस्य, कार्यकारी अभियंता दूरसंचार विभाग सदस्य, कार्यकारी अभियंता महराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी सदस्य, सहायक नियंत्रक वैधमापन शास्त्र सदस्य, जिल्हा कृषी अधीक्षक सदस्य, आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सदस्य, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सदस्य, जिल्हा माहिती अधिकारी सदस्य व जिल्हा पुरवठा अधिकारी सदस्य सचिव यांची निवड करण्यात आली आहे.
अशासकीय सदस्य म्हणून कल्पना केशव बगुलकर, संगीता विजय लोंखडे, प्रीती क्रिष्णा बरतुले, वामन सखाराम नामपल्लीवार, सदाशिव चंद्रभान सुकारे, राजेश पाडुरंग कावलकर, रमा निर्मल गर्ग, आशिष उदय कोत्तावार, रवी विश्वनाथ लोंखडे, सचिन सुरेश चिंतावार, गिरीधरसिंह रतनसिंह बैस, सिंदू सुरजराव, डॉ. योगेश सालफळे, डॉ. मंगेश गुलवाडे, मनीष व्यवहारे, नितीन गुंडेच्या, सुहाष कोतपल्लीवार, जगदिश रायठ्ठा, दत्तात्रेय गुंडावार, समिर बारई आदींची पुढील तीन वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन यांनी दिली.
सावलीत कार्यक्रम
सावली : स्थानिक तहसील कार्यालयाच्या सभागृहात नुकताच जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार उषा चौधरी, तर प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार सागर कांबळे, पुरवठा निरीक्षक चंद्रशेखर बोकडे आदी उपस्थित होते. यावेळी तहसीलदार उषा चौधरी यांनी ग्राहक अधिकाराविषयी मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण चिडे यांनी तर संचालन व आभार राजेंद्र शिंदे यांनी मानले. यावेळी स्वस्त धान्य दुकानदार बबन वाढई, प्रमोद जक्कुलवार, श्रीकांत माहीरवार, राजू बुर्रीवार उपस्थित होते.