शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

ब्रह्मपुरीतील उपाययोजनांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 5:00 AM

शहरातील नागरिकांच्या मागणीनुसार तथा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या मार्गदर्शनानंतर ब्रम्हपुरी शहरात कोरोना रुग्ण वाढू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील लॉकडाऊन ४ ते १० जूलैपर्यंत वाढविणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी दिली. तीन दिवसाचे लॉकडाऊन शुक्रवारी संपणार आहे. आता त्यात वाढ करण्यात येणार असून १० जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देआरोग्य तपासणीचे प्रमाण वाढवा : अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली कोरोनासंदर्भातील माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : चंद्रपूर जिल्ह्यात हॉटस्पॉट ठरलेल्या ब्रम्हपुरी तालुक्यातील कोरोना रुग्णाचे वाढते प्रमाण लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी ब्रम्हपुरी शहराला भेट देत संपूर्ण परिस्थिती पाहणी केली. दरम्यान, करण्यात आलेल्या उपायोजना संदर्भात माहिती जाणून घेतली.तालुक्यातील अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर नागरिकांच्या आरोग्य तपासणीचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच शहरातील कन्टेनन्मेंट झोनला भेट दिली. ब्रह्मपुरी शहरामध्ये ९ तर ग्रामीण भागात १९ रुग्ण आढळले आहे.संस्थात्मक कक्षालाही दिली भेटरेणुकामाता चौक, भवानी वार्ड परिसरातील कन्टेन्मेंट झोन, कुर्झा वार्डातील संस्थांमक विलगिकरण कक्षाला भेट दिली. त्यानंतर खेड रोड येथील कोरोना केअर सेंटरला भेट दिली. त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार विजय पवार, पोलीस निरीक्षक मुख्याधिकारी मंगेश वासेकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. खिल्लारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दुधपचारे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अनुज तारे, पोलीस निरीक्षक खाडे आदी उपस्थित होते.१० जुलैपर्यंत ब्रम्हपुरीत लॉकडाऊन : क्रांती डोंबेशहरातील नागरिकांच्या मागणीनुसार तथा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या मार्गदर्शनानंतर ब्रम्हपुरी शहरात कोरोना रुग्ण वाढू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील लॉकडाऊन ४ ते १० जूलैपर्यंत वाढविणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी दिली. तीन दिवसाचे लॉकडाऊन शुक्रवारी संपणार आहे. आता त्यात वाढ करण्यात येणार असून १० जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात येणार आहे. मात्र या लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूचे दुकान भाजीपाला, किराणा, कृषीवर आधारित खतांची दुकाने, मटण मार्केट आदी सकाळी ९ ते १ वाजेपर्यंतच खुली राहणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील रुग्णालय, मेडिकल हे जुन्याच वेळेप्रमाणे सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.८० जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले१ जुलैला शहरातील ६९ नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले असता त्यापैकी ४६ जणांना अहवाल निगेटिव्ह आले आहे. त्यापैकी ५ व्यक्तींचे अहवाल दुसºयांदा तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. तर गुरुवारी ८० जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे तहसीलदार विजय पवार यांनी सांगितले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याcollectorजिल्हाधिकारी