जिल्हाधिकाऱ्यांनी पुष्प देऊन केले मुलांचे स्वागत
By Admin | Updated: June 27, 2015 01:35 IST2015-06-27T01:35:33+5:302015-06-27T01:35:33+5:30
शाळेच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी खुटाळा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुष्प देऊन स्वागत केले.

जिल्हाधिकाऱ्यांनी पुष्प देऊन केले मुलांचे स्वागत
चंद्रपूर: शाळेच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी खुटाळा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुष्प देऊन स्वागत केले. गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण देऊन चांगले विद्यार्थी घडवा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रवेशोत्सव कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपल जाधव, शिक्षणाधिकारी रविकांत देशपांडे, संवर्ग विकास अधिकारी राजू आनंदपवार, गट शिक्षणाधिकारी बाबूराव मडावी, उपशिक्षणाधिकारी फटिंग व मुख्याध्यापक रत्नमाला रायपूरे उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात आले, जिल्ह्याची सरासरी गुणवत्ता वाढीचा सामूहीक प्रयत्न व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना विद्यार्थी न समजता आपला मुलगा समजून शिक्षण द्यावे व त्यावर चांगला व्यक्ती बनण्याचे संस्कार करावे असे ते म्हणाले. मुलांना शाळेची ओढ लागावी, असे शिकवा असा सल्ला डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिला. गुणवत्ता व क्षमता वाढीसाठी मिशन नवचेतना हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)