जिल्हा बँकेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ११ लाखांची मदत

By Admin | Updated: May 2, 2016 00:45 IST2016-05-02T00:45:23+5:302016-05-02T00:45:23+5:30

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून बँकेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ११ लाखांचा धनादेश सुपूर्द केला.

District Bank's assistance of 11 lakh to the Chief Minister's Assistance Fund | जिल्हा बँकेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ११ लाखांची मदत

जिल्हा बँकेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ११ लाखांची मदत

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून बँकेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ११ लाखांचा धनादेश सुपूर्द केला.
जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बँकेच्या अडीअडचणीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी बँकेच्या प्रगतीकरीता शासनाकडून सकारात्मक मदत करण्याचे आश्वासन यावेळी शिष्टमंडळाला दिले.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ११ लाखाचा धनादेश मुख्यमंत्र्यांना सुपुर्द करताना महाराष्ट्र राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊनकर, संचालक डॉ. अनिल वाढई, गजानन पाथोडे, अ‍ॅड. श्रीपाद पाटील, अनिल खनके, विजय बावणे, दामोधर मिसार यांच्यासह संचालक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: District Bank's assistance of 11 lakh to the Chief Minister's Assistance Fund