महिलांनी केले झाडांचे वितरण
By Admin | Updated: January 18, 2017 00:43 IST2017-01-18T00:43:27+5:302017-01-18T00:43:27+5:30
‘झाडे लावा, झाडे जगवा’, असा संदेश देत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्या दोन कोटी वृक्ष लागवडीला..

महिलांनी केले झाडांचे वितरण
१३० झाडांचे वितरण : मार्कंडेय महिला मंडळाचा उपक्रम
सावली : ‘झाडे लावा, झाडे जगवा’, असा संदेश देत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्या दोन कोटी वृक्ष लागवडीला साथ देण्याच्या उद्देशाने मार्कंडेय महिला मंडळाने मकरसंक्रातीच्या निमित्याने वाणामध्ये १३० विविध प्रजातीच्या झाडांचे वितरण केले. सदर उपक्रम राबविल्याबद्दल मार्कंडेय महिला मंडळाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
मकरसंक्रातीच्या निमित्याने ‘तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणत सर्व महिला एकत्र येऊन ‘वान’ च्या रुपात विविध वस्तू भेट देण्याची प्रथा आहे. अनेक वर्षापासून सर्वत्र हि प्रथा सुरु आहे. यामध्ये महिलाही मोठ्या आनंदाने ही प्रथा पार पाडत असतात. मात्र सावली येथील मार्कन्डेय महिला मंडळा अध्यक्षा अर्चणा अंगडीवार, आरजू बोम्मावार, अविशा आडेपवार, माया बोम्मावार, मंदा तुम्मेवार, कविता चामलवार, गायत्री तुम्मे, रजनी तुम्मे, सुमन बगळे, शोभा मुंराडे, प्रणिती नन्नेवार, रिया पाल यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सदर परंपरेला फाटा देत विविध प्रजातीच्या वृक्षाचे वितरण करण्याचा संकल्प केला. तसेच सदर झाडांची योग्य प्रकारे निगा राखण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमाचे सर्वच स्तरावरुन कौतूक करण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी)
येजगाव येथे मडकी वाटप
मूल : तालुक्यातील येजगाव येथील सामाजिक कार्यकर्ते नामदेव लेनगुरे यांनी मागील अनेक वर्षापासून तीळसंक्रातनिमित्य गावातील सर्व स्त्रियांंना वाणाच्या स्वरुपात मातीचे मडके वाटप करण्याचा उपक्रम सुरु केला. नामदेव लेनगुरे हे गावातील सर्व स्त्रियांना मकरसंक्रातीच्या दिवशी एकत्र करुन तीळगूळ घ्या, आणि गोड गोड बोला’, असे सांगत त्यांना थंड पाण्याच्या माठांचे वितरण करतात. त्यानुसार रविवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करुन माठांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन मंजुळा चलाख यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी जीवनबाई देवतळे होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून मालता वाढई, बबिता वाढई, वर्षा मोहुर्ले, सुनिता लेनगुरे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नामदेव लेनगुरे, साईनाथ लेनगुरे आदींनी प्रयत्न केले. यावेळी व्यसन सोडणाऱ्या विद्या वाढई, सुनिता शेंडे, जीवनकला रेवते, वर्षा मोहुर्ले, सोनी धांडरे, मीना वाढई यांचा सत्कार केला.