घुग्घुसमध्ये लाभार्थींना शिधापत्रिकांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:28 IST2021-04-08T04:28:36+5:302021-04-08T04:28:36+5:30

घुग्घुस : भारतीय जनता पक्षाच्या ४१व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून स्थानिक प्रयास सभागृहात लाभार्थीना शिधापत्रिकांचे, महिलांना जनधन बँक खात्यांचे ...

Distribution of ration cards to the beneficiaries in Ghughhus | घुग्घुसमध्ये लाभार्थींना शिधापत्रिकांचे वितरण

घुग्घुसमध्ये लाभार्थींना शिधापत्रिकांचे वितरण

घुग्घुस : भारतीय जनता पक्षाच्या ४१व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून स्थानिक प्रयास सभागृहात लाभार्थीना शिधापत्रिकांचे, महिलांना जनधन बँक खात्यांचे वाटप, तर महिला बचतगटांना कर्जाचे वितरण तसेच कोविड लसीकरणासाठी लस नोंदणी अभियान असा संयुक्त कार्यक्रम पार पडला.

याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते पात्र लाभार्थींना शिधापत्रिका, बँक (जनधन) खात्यांचे वाटप व महिला बचतगटांना कर्जाचे वितरण करण्यात आले.

यावेळी मंचावर घुग्घुस भाजपचे शहराध्यक्ष विवेक बोढे, भाजप नेते विनोद चौधरी, अमोल थेरे यांसह लाभार्थी महिला भगिनी सामाजिक अंतराचे नियम पाळून उपस्थित होत्या.

Web Title: Distribution of ration cards to the beneficiaries in Ghughhus