लोकसेवा आणि विकास संस्थेतर्फे मातृत्व गौरव पुरस्काराचे वितरण
By Admin | Updated: December 23, 2015 01:22 IST2015-12-23T01:22:06+5:302015-12-23T01:22:06+5:30
दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा लोकसेवा आणि विकास संस्था चंद्रपूरद्वारे मातृत्व गौरव पुरस्कार वितरण समारोहाचे आयोजन राजीव गांधी अभियांत्रिकी...

लोकसेवा आणि विकास संस्थेतर्फे मातृत्व गौरव पुरस्काराचे वितरण
चंद्रपूर : दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा लोकसेवा आणि विकास संस्था चंद्रपूरद्वारे मातृत्व गौरव पुरस्कार वितरण समारोहाचे आयोजन राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्व.छोटूभाई पटेल सभागृहात शनिवारी करण्यात आले होते.
या पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय उर्वरक व रसायन मंत्री हंसराज अहीर, कुलगुरु डॉ.एन.व्ही. कल्याणकर, माजी केंद्रिय मंत्री शांताराम पोटदुखे, अरविंद सावकार पोरेड्डीवार, विनोद दत्तात्रेय आदी मान्यवर उपस्थित होते.
समारोहात छाया पोरेड्डीवार यांना स्व. सुशिलादेवी दिक्षीत स्मृती पुरस्कार, प्रभाताई मुठाळ यांना स्व. यशवंतराव कुळकर्णी स्मृती पुरस्कार व उषा हजारे यांना स्व. भावना दीपक जयस्वाल स्मृती पुरस्कार ना. हंसराज अहीर व डॉ.एन.व्ही. कल्याणकर गडचिरोली यांच्या हस्ते रोख बक्षीस, शाल श्रीफळ व प्रमाणपत्र प्रदान करून मातृत्व गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार वितरण समारोहात डॉ.राजीव देवईकर, प्रंचित सावकार पोरेड्डीवार, डॉ.जावेद खान, अॅड. सुधीर भातकुलकर, निंबेकर, अल्लेवार व मोठ्या संख्येत प्राध्यापकगण, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. संचालन प्राचार्य डॉ.किर्तीवर्धन दिक्षीत यांनी केले. (प्रतिनिधी)