गोठणगाव येथे मच्छरदाणी वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:27 IST2021-03-18T04:27:03+5:302021-03-18T04:27:03+5:30
भिसी : जिल्हा हिवताप कार्यालय, चंद्रपूर व प्राथमिक आरोग्य केंद्र, भिसी यांच्यावतीने गोठणगाव येथे मच्छरदाणी वाटप कार्यक्रम पार ...

गोठणगाव येथे मच्छरदाणी वाटप
भिसी : जिल्हा हिवताप कार्यालय, चंद्रपूर व प्राथमिक आरोग्य केंद्र, भिसी यांच्यावतीने गोठणगाव येथे मच्छरदाणी वाटप कार्यक्रम पार पडला.
या मच्छरदाणी वाटप कार्यक्रमाचे उद्घाटन भिसी - आंबोलीच्या जिल्हा परिषद सदस्य ममता डुकरे, भिसी पंचायत समिती सदस्य प्रदीप कामडी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भिसी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत काळे, तालुका पर्यवेक्षक हजारे, गोठणगावचे सरपंच सुधाकर वाकडे, प्रभारी आरोग्य सहाय्यक जे. टी. धानके, आरोग्यसेवक के. डी. भोयर, जी. जे. सेंगर, आशा गटप्रमुख गोवर्धन, आशा सेविकांसह प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ममता डुकरे व प्रदीप कामडी यांनी मार्गदर्शन केले. गावातील एकूण ५३ कुटुंबांना मच्छरदाणीचे वाटप करण्यात आले.