मानव उत्थान सेवा समितीतर्फे दिव्यांगांना साहित्यांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:25 IST2021-01-18T04:25:17+5:302021-01-18T04:25:17+5:30

चंद्रपूर : मानव उत्थान सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष सद्गुरुदेव श्री सतपालजी महाराज यांच्या प्रेरणेने मानव उत्थान सेवा समितीतर्फे जि. ...

Distribution of literature to the disabled by Manav Utthan Seva Samiti | मानव उत्थान सेवा समितीतर्फे दिव्यांगांना साहित्यांचे वितरण

मानव उत्थान सेवा समितीतर्फे दिव्यांगांना साहित्यांचे वितरण

चंद्रपूर : मानव उत्थान सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष सद्गुरुदेव श्री सतपालजी महाराज यांच्या प्रेरणेने मानव उत्थान सेवा समितीतर्फे जि. प. उच्च प्राथमिक शाळा, यशवंतपूर येथे दिव्यांग गरजूंना व विद्यार्थ्यांना दिव्यांग सायकल, ब्लॅंकेट्स, नोटबुक, मासिक पत्रिका आदींचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मानव उत्थान सेवा समितीचे शाखा प्रभारी महात्मा कांता बाईजी, आमदार किशोर जोरगेवार, गटशिक्षणाधिकारी भसारकर, शिक्षण समन्वयक निब्रड, मुख्याध्यापिका रघटाटे आदी उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते गरजूंना व दिव्यांगांना साहित्यांचे वितरण करण्यात आले.

यावेळी आमले, चिडे, उघडे, पिंपळकर, उंडे, वरारकर, सोमलकर, बोढे, निलु सिन्हा, शिदुरकर, खवले आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी युथ मेंबर तर्फे ज्ञानेश्वर उंडे, अमोल वडस्कर, निसाळ, प्रशांत राजनकर, प्रशांत मुसळे, पवन बोढे आदींनी सहकार्य केले.

Web Title: Distribution of literature to the disabled by Manav Utthan Seva Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.