ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्रांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:28 IST2021-03-27T04:28:43+5:302021-03-27T04:28:43+5:30

गोंडपिपरी : येथील पोलीस विभागाद्वारे ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी सुरक्षिततेसाठी मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी ...

Distribution of identity cards to senior citizens | ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्रांचे वितरण

ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्रांचे वितरण

गोंडपिपरी : येथील पोलीस विभागाद्वारे ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी सुरक्षिततेसाठी मार्गदर्शन करण्यात आले.

याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे तालुका अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुरेश चौधरी, भंगाराम तळोधी येथील ज्येष्ठ नागरिक विलास माडूरवार,मोरेश्वर सूरकर, पुरुषोत्तम वाघ, जवाहर खुबवानी, वासुदेव सातपुते, बारूजी झाडे तसेच अंदाजे अन्य ज्येष्ठ नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या व संरक्षण या संदर्भात गोंडपिपरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप धोबे यांनी मार्गदर्शन केले. पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर येथून प्राप्त झालेल्या ज्येष्ठ नागरिक ओळखपत्रांचे यावेळी वितरण करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या मांडताना कृउबा समिती सभापती तथा ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष सुरेश चौधरी यांनी प्रास्ताविकातून समस्या मांडल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस कर्मचारी व ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले.

Web Title: Distribution of identity cards to senior citizens