जिल्हा बँकेकडून पीक कर्जाचे वितरण
By Admin | Updated: April 23, 2016 01:00 IST2016-04-23T01:00:06+5:302016-04-23T01:00:06+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा पाहार्णी आणि नागभीडच्यावतीने शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वितरण बँकेचे संचालक गजानन पाथोडे यांचे हस्ते करण्यात आले.

जिल्हा बँकेकडून पीक कर्जाचे वितरण
नागभीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा पाहार्णी आणि नागभीडच्यावतीने शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वितरण बँकेचे संचालक गजानन पाथोडे यांचे हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर जि.प.चे कृषी सभापती ईश्वर मेश्राम तर प्रमुख अतिथी म्हणून बाम्हणी सोसायटीचे अध्यक्ष गजभे, नंदू खोब्रागडे, वामन तलमले, जी.जे. भानारकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बाह्यणी सोसायटीच्या सभासदांना १० लाख, विलम सोसायटीच्या सभासदांना ७ लाख ३७ हजार १५० रुपये म्हसली सोसायटीच्या सभासदांना ९ लाख १४ हजार ४०० रुपयाचे पीक कर्ज वितरण करण्यात आले. यावेळी नागभीड शाखेचे व्यवस्थापक लखमापुरे, पाहार्णी शाखेचे व्यवस्थापक रविंद्र भोयर, निरीक्षक टिपले, गटसचिव एम.जी. घोटेकर यांचीही उपस्थिती होती. यावेळी बँकेचे संचालक गजानन पाथोडे यांनी सभासदांना मार्गदर्शन केले. (तालुका प्रतिनिधी)