पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कार, प्रमाणपत्रांचे वितरण

By Admin | Updated: August 17, 2016 00:37 IST2016-08-17T00:37:07+5:302016-08-17T00:37:07+5:30

भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभाप्रसंगी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते विविध पुरस्कार व प्रमाणपत्रांचे वितरण

Distribution of certificates, various awards, at the hands of Guardian | पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कार, प्रमाणपत्रांचे वितरण

पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कार, प्रमाणपत्रांचे वितरण

चंद्रपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभाप्रसंगी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते विविध पुरस्कार व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, आ.नाना शामकुळे, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, पोलीेस अधिक्षक संदीप दिवाण, जिल्हा परिषद सभापती देवराव भोंगळे, मनपा आयुक्त संजय काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी अजय रामटेके आदी उपस्थित होते.
मिनल निरंतर डांगे या खेळाडूने २०१५-१६ यावर्षी राष्ट्रीय शालेय रोलबाल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविल्याबद्दल शासनाच्या वतीने तिला ११ हजार २५० रूपयांची रोख शिष्यवृत्ती व गुष्पगुच्छ पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले. रोहीत राजेश दत्तात्रय या खेळाडूने सन २०१३-१४ यावर्षी विदर्भ क्रिकेट असोशिएशनच्या वतीने आयोजित राजसिंग डुंगरपूर ट्राफी व सन २०१५-१६ यावर्षी विजय मर्चंट ट्राफीमध्ये भाग घेऊन विशेष कामगिरी केल्याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याची बंगलोर येथील भारतीय क्रिकेट प्रशिक्षणासाठी निवड केली आहे.
या कामगिरीबद्दल त्याचा ट्रॅकसुट व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. (शहर प्रतिनिधी)

माझी कन्या भाग्यश्री या योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या पात्र लाभार्थ्यांना प्रशस्तीपत्राचे वितरण करण्यात आले. त्यात संदीप नारायण गाढवे, रा. विसापूर, बालाजी हरिदास दांडेकर, रा.चारगाव, मिथून लहुजी गद्देकार, रा.बेंबाळ, नितेश लक्ष्मण कस्तुरे, रा.जुनासुर्ला, रविंद्र तानबा मडावी, रा.केसुर्ली यांना प्रशस्तीपत्र वितरित करण्यात आले.

Web Title: Distribution of certificates, various awards, at the hands of Guardian

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.