विविध राजकीय पक्षांकडून दिनदर्शिका वाटपाचा सपाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:32 IST2021-01-16T04:32:58+5:302021-01-16T04:32:58+5:30

घुग्घुस : घुग्घुस परिसरात आपल्या पक्षाचे व नेत्याचे फोटो व केलेल्या कामाचे विवरण असलेल्या दिनदर्शिका वाटपाचा सपाटा विविध राजकीय ...

Distribution of calendars by various political parties | विविध राजकीय पक्षांकडून दिनदर्शिका वाटपाचा सपाटा

विविध राजकीय पक्षांकडून दिनदर्शिका वाटपाचा सपाटा

घुग्घुस : घुग्घुस परिसरात आपल्या पक्षाचे व नेत्याचे फोटो व केलेल्या कामाचे विवरण असलेल्या दिनदर्शिका वाटपाचा सपाटा विविध राजकीय पक्षांच्या नेते मंडळींनी सुरू केला. घुग्घुस नगरपालिका जाहीर होताच राजकीय पक्ष यातून नागरिकांना खूश करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

बरेचशी मंडळी राजकीय पक्षाच्या नेत्याच्या फोटो असलेल्या दिनदर्शिका घेणे पसंत करीत नाही. पण नाईलाज म्हणून आता दिनदर्शिका घेत असल्याचे दिसून येते.

पूर्वी घरी दिनदर्शिका विकत घ्याव्या लागत होत्या. एखादी दिनदर्शिका विकत घेऊन घरी सणवार पाहण्यासाठी ठेवत होते. मात्र आता विविध राजकीय पक्षाच्या नेते आपला फोटो, केलेल्या कामाचे विवरण असलेल्या दिनदर्शिका छापून घरोघरी ही दिनदर्शिका देण्यात धन्यता मानत आहेत. दोन प्रबळ राजकीय पक्षात तर दिनदर्शिका वितरण करण्याची जणू स्पर्धाच सुरू आहे. या दिनदर्शिकाचा लाभ येत्या नगर परिषद निवडणुकीत कोणाला मिळेल, हे मात्र निवडणुकीनंतरच कळणार आहे.

Web Title: Distribution of calendars by various political parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.