मूलमध्येही आढळले खवले मांजर
By Admin | Updated: August 13, 2016 00:27 IST2016-08-13T00:27:42+5:302016-08-13T00:27:42+5:30
दोन दिवसांपूर्वी बेंबाळ येथील गड्डमवार यांच्या घरी खवल्या मांजर आढळून आल्याची घटना ताजी असतानाच ...

मूलमध्येही आढळले खवले मांजर
मूल : दोन दिवसांपूर्वी बेंबाळ येथील गड्डमवार यांच्या घरी खवल्या मांजर आढळून आल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी रात्री १० वाजतादरम्यान नगरसेवक बाबा अझीम यांच्या घराशेजारी खवल्या मांजर आढळून आले आहे. येथील नगरसेवक बाबा अझीम यांच्या लक्षात आले. त्यांनी मूल येथील सर्पमित्र उमेशसिंह झिरे यांना माहिती दिली. उमेशसिंह झिरे यांनी वन विभागाचे क्षेत्र सहायक बालपणे, जांभुळे, वनरक्षक शिवरकर यांना माहिती दिली. तन्मयसिंह झिरे यांना सोबत घेऊन खवल्या माजराला पकडण्यात आले. सदर खवल्या मांजर दीड वर्षाचे आहे. सदर खवल्या मांजराची वन्यजीव संस्थेच्या प्रतिनिधीनी तपासणी केली असता ही मादी जातीची असल्याचे आढळून आले. (शहर प्रतिनिधी)