घुग्घुस नगरपालिकेच्या कचरा यार्डची विल्हेवाट लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:18 IST2021-07-09T04:18:35+5:302021-07-09T04:18:35+5:30
घुग्घुस : गावालगत नियोजित क्रीडांगणाच्या जागेवर विविध वॉर्डमधील ओला, कोरडा कचरा गोळा करून टाकला जात आहे. त्या कचरा यार्डमध्ये ...

घुग्घुस नगरपालिकेच्या कचरा यार्डची विल्हेवाट लावा
घुग्घुस : गावालगत नियोजित क्रीडांगणाच्या जागेवर विविध वॉर्डमधील ओला, कोरडा कचरा गोळा करून टाकला जात आहे. त्या कचरा यार्डमध्ये प्लास्टिक जळत असून, सतत दुर्गंधी येत असते. यामुळे लोकवसाहतीतील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
कचरा यार्ड लोकवसाहतीच्या दूर इतरत्र हलविण्यात यावा, अशी वेळोवेळी मागणी करण्यात येत आहे. मात्र नगर पालिकेचे प्रशासक या समस्येची दखल घेत नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल. गावातील वाॅर्डातील ओला, सुका कचरा घंटागाडीने जमा करून गावालगत लोकवसाहतीला लागून टाकत असतात. त्या कचऱ्याची नंतर विल्हेवाट लावली जात नसल्याने पावसाच्या पाण्यात भिजून दुर्गंधी पसरली आहे. कचऱ्यातील प्लास्टिक उडून नागरिकांच्या घरात येत आहे. गावाला व लोकवसाहतीला लागून असलेले कचरा यार्ड लोकवसाहतीपासून दूर हटवा, अशी मागणी आहे.