इलेक्ट्रिक वाहने व सोलर उपकरणांचे प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:29 IST2021-04-01T04:29:17+5:302021-04-01T04:29:17+5:30
माझी वसुंधरा अभियान : चंद्रपूर शहर महापालिकेचे आयोजन चंद्रपूर : माझी वसुंधरा अभियानांतर्गत वायुप्रदूषण कमी करून पर्यावरणपूरक वाहनांना ...

इलेक्ट्रिक वाहने व सोलर उपकरणांचे प्रदर्शन
माझी वसुंधरा अभियान : चंद्रपूर शहर महापालिकेचे आयोजन
चंद्रपूर : माझी वसुंधरा अभियानांतर्गत वायुप्रदूषण कमी करून पर्यावरणपूरक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच अपारंपरिक ऊर्जास्रोतांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे इलेक्ट्रिक वाहने व सोलर उपकरणांच्या प्रदर्शनीचे आयोजन मनपा मुख्य इमारत परिसरात करण्यात आले होते.
पृथ्वी, वायू, जल, अग्नी व आकाश या पंचतत्त्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान महानगरपालिका क्षेत्रात राबविले जात आहे. महापौर राखी संजय कंचर्लावार, स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांनी प्रदर्शनीला भेट देत इलेक्ट्रिक वाहने व सोलर उपकरणांची माहिती घेतली. वायुप्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने प्रदर्शनी एस.आर मोटर्स यांच्या सहकार्याने तर अपारंपरिक ऊर्जास्रोतांना प्रोत्साहन देण्याकरिता सोलर उपकरणांची प्रदर्शनी चंद्रपूर महानगरपालिका, हसन सोलर व सनराइज पवार सोल्युशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. कोरोना नियमांचे पालन करून पार पडलेल्या या प्रदर्शनीला मोठ्या प्रमाणात नागरिकांचा सहभाग होता. याप्रसंगी उपायुक्त विशाल वाघ, राहुल घोटेकर, संदीप आवारी, सुभाष कासनगोट्टूवार, नगरसेविका छबूताई वैरागडे, आकाश निंबाळकर, सहायक आयुक्त विद्या पाटील, शीतल वाकडे व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.