चार लाख बालकांना जंतनाशक गोळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 10:57 PM2019-08-05T22:57:14+5:302019-08-05T22:57:27+5:30

जिल्ह्यातील ४ लाख, ४३ हजार,४६१ बालकांना ८ आॅगस्टपासून जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज असून नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी केले आहे.

Disinfection pills for four million children | चार लाख बालकांना जंतनाशक गोळ्या

चार लाख बालकांना जंतनाशक गोळ्या

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकारी : गुरूवारपासून जिल्ह्यात जंतनाशक मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील ४ लाख, ४३ हजार,४६१ बालकांना ८ आॅगस्टपासून जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज असून नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी केले आहे.
या मोहिमेच्या जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा नुकतीच पार पडली. यावेळी वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस.मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कार्डिले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. संदीप गेडाम आदींची उपस्थिती होती. यावेळी इतर आरोग्य विषयक योजनांचाही आढावा घेण्यात आला.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात १ ते १९ वयोगटातील जवळपास ६८ टक्के मुले असुन त्यातील २८ टक्के मुलांना आतड्यामध्ये वाढणारे परजीवी जंतापासुन धोका आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे, वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचा अभाव आहे. कृमीदोषांचा संसर्ग दुषित वातावरणाच्या संपर्कात आल्यामुळे होतो. बालकांमध्ये होणारा दीर्घकालीन कृमीदोष हा व्यापक आणि मुलांना कमजोर करणारा आहे. कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे तसेच बालकांची बौध्दिक व शारीरीक वाढ खुंटण्याचेही कारण ठरते. भारतात ५ वर्षांखालील मुला - मुलींमध्ये ७० टक्के रक्तक्षयाचे प्रमाण आढळून आले आहे. महाराष्ट्रात पाच वर्षाखालील कुपोषणामुळे वाढ खुंटलेल्या बालकांची टक्केवारी एन. एफ. एच. एस ४ च्या सर्व्हेनुसार ३४.४ टक्के आहे. तसेच एन.एफ.एच.एस ३ च्या सर्व्हेनुसार १५ ते १९ वर्षे वयोगटातील ५६ टक्के किशोरवयीन मुलींमध्ये व ३० टक्के मुलांमध्ये रक्तक्षय आढळतो. केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार मातीतून प्रसारित होणाऱ्या कृमीदोषाचे प्रमाण महाराष्ट्रात २९ टक्के आढळले आहे. त्याअनुषंगाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार राज्यात राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम राबविण्यात येत आहे.
१ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुलां-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्रस्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा मुख्य उद्देश आहे. सदर मोहिम सर्व शासकीय शाळा, शासकीय अनुदानित शाळा, आश्रमशाळा, महानगरपालिका क्षेत्र वगळूण व सर्व खाजगी अनुदानित शाळा, सर्व खाजगी विनाअनुदानित शाळा, आर्मी स्कुल, सी. बी. एस. सी. स्कुल, नवोदय, सुधार गृह, सर्व खाजगी इंग्रजी माध्यमिक शाळा, मदरसे, मिशनरी स्कुल, गुरुकूल संस्कार केंद्रे, सर्व कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रथम वर्षांचे विद्यार्थी, नर्सिग कॉलेज, आय.टी.आय., पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, कला वाणिज्य व विज्ञान, फार्मसी, महाविद्यालय, डी.एड् महाविद्यालय, सर्व ग्रामीण व शहरी अंगणवाडी व मिनी अंगणवाडी केंद्रात राबविण्यात येणार आहे. या मोहीमेला नागरिकांनी सहकार्य करण्याची विनंती जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.

Web Title: Disinfection pills for four million children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.