शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

खाण कामगारांच्या मागण्यांवर विधानसभेत चर्चा

By admin | Updated: December 17, 2015 01:08 IST

भद्रावती तालुक्यातील बरांज कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांची कोळसा कंपनी व शासनाकडून फसवणूक झाल्याने त्या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी....

आठ किमीच्या आत होणार गावाचे पुनर्वसन : ४६४ कामगारांना करणार पूर्ववतभद्रावती : भद्रावती तालुक्यातील बरांज कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांची कोळसा कंपनी व शासनाकडून फसवणूक झाल्याने त्या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी वरोरा-भद्रावती निर्वाचन क्षेत्राचे आ. बाळू धानोरकर यांनी हा प्रश्न अधिवेशनात लावून धरला. त्या अनुषंगाने १६ डिसेंबर रोजी सभागृहात आ. बाळू धानोरकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली. विधानसभेमध्ये लागलेल्या लक्षवेधी सूचना क्रमांक ३ नुसार आ. बाळू धानोरकर यांनी बरांज येथील १ एप्रिल २०१५ पासून बंद असलेल्या व केपीसीएलला आवंटीत झालेल्या खाणीचा, प्रकल्पग्रस्तांचा व कामगारांच्या नोकरीचा विषय मांडला असता, महाराष्ट्र शासनाने प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन कुडरारा या गावी न करता ८ कि.मी. च्या आत करण्याचे मान्य केले. तसेच ४६४ कामगारांना उर्वरीत ७ महिन्याचे वेतन देण्याचे देखील मान्य केले. त्याचप्रमाणे एकुण ४६४ कामगारांना कामावरून कमी न करता पुर्ववत कामावर ठेवण्याचे देखील कबुल केले.९ नोव्हेंबर २०१५ रोजी महाराष्ट्र शासन व कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमिटेडमध्ये झालेला करारनामा रद्द करावा व कोल इंडियाची सन २०१२ ची पॉलीसी लागू करावी, अशी मागणी केली असता पुनर्वसन करारनामा तपासून त्याविषयी योग्य निर्णय घेऊ, असे राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री दिलीप कामडे यांनी आश्वासन दिले. या सर्व बाबीवरून ११ नोव्हेंबर २०१५ रोजी महाराष्ट्र शासनाचा केपीसीएलसोबत झालेला पुनर्वसनाचा करारनामा रद्द होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसुन येते.तत्पुर्वी दुपारी १२ वाजता आ. बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वात सभागृहापुढे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. विविध घोषणा याप्रसंगी देण्यात आल्या. आंदोलनाचे वेळी आ. डॉ. राहुल पाटील, आ. हर्षवर्धन जाधव, आ.योगेश घोलप, आ. किशोर आप्पा पाटील, आ. सुभाष भोईर, आ. मंगेश कुडाळकर, आ. साळवी, आ. सुर्वे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)