सोयरिकीच्या बैठकीत ग्रामपंचायत निवडणुकीवर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:35 IST2021-01-08T05:35:06+5:302021-01-08T05:35:06+5:30
बैठकीत गावपुढारी, शिक्षक मंडळी उपस्थित असले की, चर्चा अधिक रंगत आहे. विषय गावातील राजकारणापासून सुरू होऊन तो दिल्लीच्या राजकारणापर्यंत ...

सोयरिकीच्या बैठकीत ग्रामपंचायत निवडणुकीवर चर्चा
बैठकीत गावपुढारी, शिक्षक मंडळी उपस्थित असले की, चर्चा अधिक रंगत आहे. विषय गावातील राजकारणापासून सुरू होऊन तो दिल्लीच्या राजकारणापर्यंत जात आहे. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचा हंगाम असून या निवडणुकीचा ज्वर आता गावखेड्यांमध्ये तापू लागला आहे. दरम्यान, वर-वधूंचा शोध व त्याकरिता बैठका होत आहेत. ग्रामीण भाग असो की, शहरी लग्न जुळण्याच्या बैठकीत लग्न जुळण्यात सोबतच निवडणुकीच्या चर्चा रंगत आहेत. सोशल माध्यमाद्वारे प्रचार निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर प्रचाराने गती घेतली आहे. काही उमेदवारांनी चिन्ह मिळताच आपले निवडणूक चिन्ह व्हाॅट्सॲपवर टाकून प्रचाराला प्रारंभ केला आहे. फलक बोर्ड पत्रक याहून व्हाॅट्सॲपवरून प्रचाराने अधिक मतदारापर्यंत जाता येते. सर्वदूर नाव जाते, प्रसिद्धी मिळते असे उमेदवारांचे म्हणणे आहे.