पालक-शिक्षक सभेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर चर्चा

By Admin | Updated: August 7, 2015 00:06 IST2015-08-07T00:06:31+5:302015-08-07T00:06:31+5:30

येथील नेवजाबाई हितकारिणी मुलांच्या शाळेत पालक- शिक्षक सभा झाली. या सभेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर चर्चा करण्यात आली.

Discuss on the quality of students in the parent-teacher meeting | पालक-शिक्षक सभेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर चर्चा

पालक-शिक्षक सभेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर चर्चा

ब्रह्मपुरी : येथील नेवजाबाई हितकारिणी मुलांच्या शाळेत पालक- शिक्षक सभा झाली. या सभेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर चर्चा करण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी जयश्री रणदिवे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून संस्थासचिव अशोक भैया, मुख्याध्यापक गिरीधर लडके व्यासपिठावर उपस्थित होते.
यावेळी नवीन शिक्षक-पालक संघाची कार्यकारणी गठीत करण्यात आली. अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक जी. जी. लडके, उपाध्यक्ष शरदचंद्र ठोकरे, सचिव डी. एस. राऊत, सहसचिव माधुरी ब्राम्हणकर, विद्यार्थी प्रतिनिधी स्वप्नील देशमुख व २९ तुकड्याचे सर्व शिक्षक आणि एक पालक या प्रमाणे कार्यकारिणी गठीत करण्यात आली. पाल्याच्या शैक्षणिक विकास व योजना यावर बोलताना अशोक भैय्या यांनी मार्गदर्शन केले. पालकांनीही याप्रसंगी विचार व्यक्त केले.
मुख्याध्यापक लडके व उपमुख्याध्यापक शेख यांनी शाळेच्या उपक्रम तथा शैक्षणिक आढाव्याची माहिती विषद केली. संचालन घोरुडे तर आभार देवानंद राऊत यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Discuss on the quality of students in the parent-teacher meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.