परवानाधारकांचा रॉकेल वितरणास नकार

By Admin | Updated: October 18, 2015 01:14 IST2015-10-18T01:14:12+5:302015-10-18T01:14:12+5:30

सिलिंडरधारकांना रॉकेल देण्यात येऊ नये. त्यामुळे परवानाधारक रॉकेल वितरकांचा रॉकेल कोटा कमी करण्यात आला.

Disclaimer of kerosene distribution to licensees | परवानाधारकांचा रॉकेल वितरणास नकार

परवानाधारकांचा रॉकेल वितरणास नकार

कमिशनमध्ये पडणार फरक : सिलिंडरधारकांना रॉकेल देऊ नका, हा आदेश अमान्य
वरोरा : सिलिंडरधारकांना रॉकेल देण्यात येऊ नये. त्यामुळे परवानाधारक रॉकेल वितरकांचा रॉकेल कोटा कमी करण्यात आला. त्यामुळे अनेक परवानाधारक रॉकेल विक्रेत्यांनी वितरणास नकार दिल्याने गरजू नागरिकांना रॉकेल वितरण करण्याकरिता प्रशासनापुढे पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ज्या नागरिकांजवळ गॅस सिलिंडर आहे व त्याची नोंद राशन कार्डवर असल्यास अशा कुटुंबास परवानाधारक विक्रेत्यांनी रॉकेल दिल्यास त्याच्यावर कठोर कारवाईचे संकेत काही दिवसांपूर्वी प्रशासनाने दिले. गॅस सिलिंडर धारकांची संख्या लक्षात घेऊन परवानाधारक रॉकेल विक्रेत्याच्या कोट्यात घटही करण्यात आली. गॅस सिलिंडरधारकही दुकानदारांना रॉकेल मागत आहे. परंतु नवीन नियमानुसार अशा व्यक्तींना रॉकेल देण्यास परवानाधारक विक्रेते तयार नाहीत. त्यामुळे अनेकदा भांडणे झाली आहेत. ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी सिलिंडर पोहचविण्याची व्यवस्था नाही. एकच गॅस सिलिंडर संपल्यानंतर दोन ते तीन दिवस सिलिंडर मिळत नाही. अशा वेळी रॉकेल नाही, त्यामुळे ग्रामीण नागरिकांसमोर संकट निर्माण झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)

 

Web Title: Disclaimer of kerosene distribution to licensees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.