सिंदेवाहीच्या महाराष्ट्र बँकेत गैरसोय

By Admin | Updated: July 12, 2017 00:46 IST2017-07-12T00:46:46+5:302017-07-12T00:46:46+5:30

तालुक्याचे ठिकाण असलेल्या सिंदेवाही येथे ग्राहकांची अडचण दूर करण्यासाठी बँक आॅफ महाराष्ट्र शाखेची सुरूवात करण्यात आली.

Disadvantages in Sindhvihi Maharashtra Bank | सिंदेवाहीच्या महाराष्ट्र बँकेत गैरसोय

सिंदेवाहीच्या महाराष्ट्र बँकेत गैरसोय

एटीएम ठरले शोभेचे : एकाच कॉऊंटरवर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदेवाही : तालुक्याचे ठिकाण असलेल्या सिंदेवाही येथे ग्राहकांची अडचण दूर करण्यासाठी बँक आॅफ महाराष्ट्र शाखेची सुरूवात करण्यात आली. या बँक शाखेच्या ग्राहकांची संख्या शेकडोवर आहे. मात्र पुरेशा सुविधा बँकेकडून पुरविण्यात येत नसल्याने एकाच कॉऊंटरवर ग्राहकांची लांबच लांब लागलेली दिसून येते. त्यामुळे ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सिंदेवाही येथे विविध शासकीय कार्यालये, शैक्षणिक व सहकारी संस्था, शाळा, महाविद्यालय तथा डॉ. पंजाबाराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विभागीय कृषी संशोधन केंद्र व कृषी विज्ञान केंद्र आहे. त्यामुळे या सर्व कार्यालयातील अनेकांनी या बँकेत खाते उघडले आहे. या बँकेत बचत खाते, संजय गांधी निराधार योजना, घरकुल योजना, पीक कर्ज, रोजगार हमी योजना, व्यापारी व महिला बचतगट मिळून एकूण अंदाजे ४० हजाराच्यावर खातेदार आहेत. त्यामुळे खेड्यापाड्यातून अनेक निराधार व वृध्द महिला लाभार्थी पैसे काढण्याकरिता येथे येतात. मात्र एकच कॉऊंटर असल्यामुळे बँकेत प्रचंड गर्दी असते. बँकेत बसण्याकरिता जागा नाही. कॅश काढणे व भरणे यासाठी एकच कॉऊंटर असल्याने ग्राहकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. याकडे मात्र बँक व्यवस्थापकाचे दुर्लक्ष होत आहे. शहरात याच बँकेचे एटीएम आहे. परंतु या एटीएम मध्ये अनेकदा कॅश उपलब्ध राहत नाही. त्यामुळे ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

सिंदेवाही तालुक्याचे ठिकाण असल्यामूळे बँकेतील गर्दी असते. बँक आॅफ महाराष्ट्र सिंदेवाही शाखेत दोन कॉऊंटरची आवश्यकता आहे. तसेच बँक प्रशस्त जागेत असणे गरजेचे आहे.
- रमेश बिसेन
अध्यक्ष, व्यापारी संघठना सिंदेवाही

Web Title: Disadvantages in Sindhvihi Maharashtra Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.