राजुरा येथील सेतू केंद्रात नागरिकांची गैरसोय
By Admin | Updated: August 7, 2016 00:45 IST2016-08-07T00:45:10+5:302016-08-07T00:45:10+5:30
तहसील कार्यालयाची प्रशस्त देखण्या इमारतीचे बांधकाम झाले असून या ठिकाणी सेतू केंद्रासह विविध विभागाच्या कार्यालयानी स्थानांतरण केले आहे.

राजुरा येथील सेतू केंद्रात नागरिकांची गैरसोय
अशोक राव : बसण्यासाठी आसन व्यवस्था करावी
राजुरा : तहसील कार्यालयाची प्रशस्त देखण्या इमारतीचे बांधकाम झाले असून या ठिकाणी सेतू केंद्रासह विविध विभागाच्या कार्यालयानी स्थानांतरण केले आहे. बहुतांश नागरिकांना सेतू केंद्रात काम असते. नागरिकांना दालनात बसण्यासाठी आसनाची व्यवस्था नसल्यामुळे उभेच राहावे लागत असल्याने याचा त्रास होत आहे. ही समस्या निकाली काढण्याचे निवेदन राजुरा युवक काँग्रेस विधानसभा क्षेत्राचे सचिव अशोक राव यांनी तहसीलदारांना सादर केले आहे.
तहसील कार्यालयाच्या प्रशस्त इमारतीत महसूल विभागाची सर्व कार्यालये, उपविभगीय अधिकारी कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, उपविभागीय कृषी कार्यालय, हत्ती रोग निर्मूलन कार्यालय, लघु सिंचन विभाग आदी अनेक विभागांनी आपल्या कार्यालयाचे स्थानांतर नव्या इमारतीत केले आहे.
सेतू केंद्रात पुरेशा फर्निचरची व्यवस्था नाही. तेथे कार्यरत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी सोय नसल्याने उभेच रहावे लागत असते. इमारती बाहेर वाहने पार्किंग करण्यासाठी योग्य जागा निश्चित केलेली आहे. परंतु अनेकजण आपली वाहने इमारतीसमोर उभी करीत असल्याने नागरिकांना इमारतीत प्रवेश करताना त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व समस्यांचे निवेदन राजुरा तहसीलदार धर्मेश फुसाटे यांना देऊन या समस्या लवकरात लवकर निकाली काढण्यासंबंधी चर्चा करण्यात आली.
यावेळी राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे सचिव अशोक राव, सय्यद युसूफ, सुनील सकनाले, मयूर साळवे, गणेश इटनकर, अनिकेत मोरे, अमित गौरकार, निरंजन मंडल, पंकज वरखडे, विक्की रामटेके, छबीलाल नाईक आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)