शरीरावर बाटल्या चिकटवून दारूतस्करी

By Admin | Updated: September 25, 2016 01:23 IST2016-09-25T01:23:04+5:302016-09-25T01:23:04+5:30

चिकटपट्टीच्या सहाय्याने पोट, पाट व पायाला दारूच्या बाटल्या चिकटवून चंद्रपूर आणताना लाठी पोलिसांनी सकमूर गावात एकाला अटक केली.

Dilute the bottles on the body | शरीरावर बाटल्या चिकटवून दारूतस्करी

शरीरावर बाटल्या चिकटवून दारूतस्करी

धाबा : चिकटपट्टीच्या सहाय्याने पोट, पाट व पायाला दारूच्या बाटल्या चिकटवून चंद्रपूर आणताना लाठी पोलिसांनी सकमूर गावात एकाला अटक केली. त्याच्याकडून ३० दारू बाटल्या जप्त केल्या आहे. आरोपीचे नाव संपत जेतोदर राजवंशी आहे. लाठी पोलिसांनीही पोडसा - आर्वी या पाँईटवर तडीरामाची धरपकड केली.
तेलंगनाच्या सिमेवर पोडसा पूल हा दारू तस्करीचा सेतू ठरला आहे. पोलीस उपनिरीक्षक एम.व्ही. कोंडावार यांनी तस्करांवर नजर ठेवली असल्याने संपत राजवंशी दारू आणताना पकडल्या गेला. या पाईंटवर गस्तीवर असलेल्या पोलिसांना संपत राजवंशीचे पोट व पाट फुगलेली दिसली. त्याला दुचाकीवरून उतरवून तपासणी केली त्यावेली त्याने चिकटपट्टीच्या सहाय्याने दारूच्या बाटल्या शरिरावर चिकटवीले असल्याचे आढळून आले. तो चंद्रपुरातील बंगाली कॅम्प परिसरातील रहिवासी आहे. ही कारवाई सुकराज यादव, साई उपरे, रघुनाथ पेंदाम यांनी केली. (वार्ताहर)

Web Title: Dilute the bottles on the body