वढोलीत पांदण रस्त्याची दैनावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:26 IST2021-09-13T04:26:45+5:302021-09-13T04:26:45+5:30

प्रवासी वाहनातून नियमांचे उल्लंघन घोसरी : पोंभूर्णा तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनातील प्रवासी विनामास्क सर्रासपणे ये-जा करीत आहेत. ...

The dilapidated condition of the road | वढोलीत पांदण रस्त्याची दैनावस्था

वढोलीत पांदण रस्त्याची दैनावस्था

प्रवासी वाहनातून नियमांचे उल्लंघन

घोसरी : पोंभूर्णा तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनातील प्रवासी विनामास्क सर्रासपणे ये-जा करीत आहेत. याकडे मात्र पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. पोंभूर्णा तालुक्यातील नांदगाव-गोंडपिपरी, पोंभूर्णा-चंद्रपूर मार्गावर हा प्रकार सुरू आहे.

कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची मागणी

मूल : तालुक्यातील बेंबाळ येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिसरात राष्ट्रीयीकृत बँकेची एकच शाखा असल्याने येथे मोठी गर्दी असते. त्यामुळे रिक्त पदे त्वरित भरावीत, अशी मागणी आहे.

येलापूर-येन्सापूर रस्त्याची दुरुस्ती करा

कोरपना : तालुक्यातील येलापूर, येन्सापूर, कारगाव, पिपरी, बाखर्डी ते नांदा, आदी गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात दरवर्षी या रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

Web Title: The dilapidated condition of the road