धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी सजली

By Admin | Updated: October 13, 2014 23:32 IST2014-10-13T23:32:26+5:302014-10-13T23:32:26+5:30

येथील पवित्र दीक्षाभूमीवर आयोजित धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाला १५ आॅक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. दोन दिवशीय सोहळ्यासाठी देशभरातील भिक्खुगण, बौद्ध, आंबेडकरी विचारवंत, विविध समीक्षक,

Dikshakrach Dikshitabhoomi celebrated on the day of observance day | धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी सजली

धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी सजली

चंद्रपूर : येथील पवित्र दीक्षाभूमीवर आयोजित धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाला १५ आॅक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. दोन दिवशीय सोहळ्यासाठी देशभरातील भिक्खुगण, बौद्ध, आंबेडकरी विचारवंत, विविध समीक्षक, साहित्यिक, देश-विदेशातील अभ्यासकांचे प्रबोधन यावेळी होणार आहे. यासाठी येथील दीक्षाभूमी सज्ज झाली आहे.
समारंभस्थळी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थिचे जतन केलेला अस्थिकलश दर्शनार्थ ठेवण्यात येणार आहे. बुद्धधम्म प्रचारकांकडून धम्ममय आनंदाची रुजवण, जगविख्यात बुद्धधम्म प्रचारकांकडून धम्म श्रवण, धम्मसंबंधित उपयुक्त वस्तुंचे स्टॉल, बोधीवृक्षाचे दर्शन हे या समारंभाचे खास वैशिष्ट आहे.
संपूर्ण दीक्षाभूमी परिसर रोषणाई करण्यात आली आहे. दीक्षाभूमीस्थळी तथागत गौतम बुद्ध व प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य छायाचित्र उभारण्यात आले आहे.
या समारंभाची जवळपास पूर्ण तयारी झाली आहे. येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी दीक्षाभूमी सज्ज झाली आहे. धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभादरम्यान १५ आॅक्टोबरला सायंकाळी ६.३० वाजता वाहनासह मिरवणूक निघेल. १६ आॅक्टोबरला सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेबांच्या अस्थिकलशासह मिरवणूक निघणार आहे. यात बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याची विनंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी चंद्रपूरचे अध्यक्ष अरुण घोटेकर, सचिव वामनराव मोडक, उपाध्यक्ष अशोक घोटेकर तथा सदस्यांनी केली आहे. १५ आॅक्टोबरला निवडणूक असल्याने यावर्षी सायंकाळी ६.३० नंतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.(नगर प्रतिनिधी)

Web Title: Dikshakrach Dikshitabhoomi celebrated on the day of observance day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.