डीजिटल सातबाराचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 23:15 IST2019-02-24T23:15:14+5:302019-02-24T23:15:32+5:30
चिमूर तालुक्यात आॅनलाईन डीजिटल स्वाक्षरीसह सातबारा मिळणार, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. मात्र हे काम रखडल्याने विविध योजनांचा शेतकºयांना लाभ मिळण्यास विलंब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

डीजिटल सातबाराचे काम रखडले
लोकमत न्यूज नेटवर्क
मासळ (बु.) : चिमूर तालुक्यात आॅनलाईन डीजिटल स्वाक्षरीसह सातबारा मिळणार, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. मात्र हे काम रखडल्याने विविध योजनांचा शेतकºयांना लाभ मिळण्यास विलंब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शासनांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून डीजिटल स्वाक्षरीसह आॅनलाईन सातबारा उपक्रमांचे काम तलाठ्यांमार्फत सुरू आहे. मात्र आॅनलाईन सातबारा करताना संगणकात बिघाड निर्माण झाला. परिणामी, ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महसूल प्रशासनाची धावपळ सुरू आहे. दरम्यान, विविध मागण्यांसाठी तलाठी संघटनेने कामावर बहिष्कार टाकला होता.
याच कालावधीत पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे काम प्राधान्याने करावे, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले. यामुळे तालुक्यातील तलाठी शेतकरी सन्मान योजनेच्या कामाला प्राधान्य देत आहेत. मात्र या धावपळीत आॅनलाईन सातबारा डीजिटल स्वाक्षरीचे काम थांबविले आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे काम फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर लवकरच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते.