रस्त्यावरील अतिक्रमणाने वाहतुकीस अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 23:53 IST2017-12-17T23:52:45+5:302017-12-17T23:53:01+5:30
शहरातील काही रस्ते अजूनही वाहतुकीस सुरक्षित नाहीत. त्यामुळे लहान मुले, महिला व वयोवृद्ध नागरिक वाहतुकीसाठी दमछाक करावी लागत असते.

रस्त्यावरील अतिक्रमणाने वाहतुकीस अडचण
आॅनलाईन लोकमत
ब्रह्मपुरी : शहरातील काही रस्ते अजूनही वाहतुकीस सुरक्षित नाहीत. त्यामुळे लहान मुले, महिला व वयोवृद्ध नागरिक वाहतुकीसाठी दमछाक करावी लागत असते. अशातच शिवाजी चौक ते सावरकर चौकातील रस्त्याची अवस्था ही वर्षानुवर्षे वाहतुकीसाठी त्रासदायक ठरत आहे. या रस्त्याला मोकळा श्वास कोण मिळवून देणार, असा प्रश्न अनेक नागरिक विचारत आहेत.
शहरातील प्रमुख रस्ता म्हणून शिवाजी चौक ते सावरकर चौक या रस्त्याची ओळख आहे. हा प्रमुख रस्ता असल्याने लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत वाहतुकीसाठी उपयोगात येत असते. परंतु, वर्षानुवर्षे या रस्त्यावर विक्रेते, मोटरसायकल व मोठे वाहन तसेच दुकानदारांनी केलेले अतिक्रमण आदी कारणांनी हा रस्ता अरुंद झाला आहे. या रस्त्यावरुन जाण्यासाठी सावधपूर्वक वाहतूक करूनच जावे लागते. रस्ते जर अतिक्रमणाने बरबटले असतील तर सुरळीत वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर येताना दिसून येतो. त्यामुळे येथील एका नागरिकाने प्रस्तुत प्रतिनिधीला पत्र पाठवून रस्ता मोकळा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
ही खदखद केवळ एका नागरिकाची नसून अशा अनेक नागरिकांची असल्याने या प्रश्नाला प्रशासनाने गंभीरतेने गरजेचे आहे. पण प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवून प्रश्नांची तिव्रता वाढविली जात आहे.
नगर पालिका व पोलीस प्रशासन या दोघांच्याही अखत्यारीत हा प्रश्न आहे. त्यामुळे प्रश्न सामंजस्याने सोडविण्याची खरी गरज आहे. पण दोघांनीही हात वर केल्याचे दिसून येत आहे. दोन्ही विभागाचे एकमेकांकडे बोट दाखविने सुुरू आहे. मात्र अतिक्रमण हटविण्यासाठी पुढाकार घेतल्यास नागरिकांच्या सोयीचे ठरणार आहे.