रस्त्याअभावी शेती करण्यास अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:32 IST2021-01-08T05:32:23+5:302021-01-08T05:32:23+5:30
वेस्टर्न कोल फील्ड लि.चे पोवनी २ आणि ३ प्रकल्पासाठी साखरी व पोवनी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. मात्र ...

रस्त्याअभावी शेती करण्यास अडचण
वेस्टर्न कोल फील्ड लि.चे पोवनी २ आणि ३ प्रकल्पासाठी साखरी व पोवनी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. मात्र येथील ३६ शेतकऱ्यांची एकूण ३४.९१ हेक्टर शेतजमीन सोडून देण्यात आली. सभोवतालच्या परिसरात कोळसा खाण सुरू झाल्याने रस्त्याअभावी या शेतकऱ्यांना शेतीची वहिवाट करण्यास अडचण जात आहे. यासोबतच परिसरातील वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे शेती करणे अवघड झाले आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी वेकोलिकडे पत्रव्यवहार करून जमीन संपादित करण्याची मागणी केली. मात्र याबाबत अद्यापही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. परिणामी शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे सरचिटणीस उमाकांत धांडे यांनी खासदार बाळू धानोरकर, पालकमंत्री विजय वडेट्टीवार, जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.