आखिव पत्रिका मिळत नसल्याने मालमत्तेच्या खरेदी-विक्रीत अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:29 IST2021-09-27T04:29:56+5:302021-09-27T04:29:56+5:30
भद्रावती : नगरपालिका क्षेत्रातील गवराळा, सुमठाणा आणि विंजासन या जुन्या गावठाणांतील आखिव पत्रिका प्रशासनाकडे उपलब्ध नसल्यामुळे येथील नागरिकांची ...

आखिव पत्रिका मिळत नसल्याने मालमत्तेच्या खरेदी-विक्रीत अडचण
भद्रावती : नगरपालिका क्षेत्रातील गवराळा, सुमठाणा आणि विंजासन या जुन्या गावठाणांतील आखिव पत्रिका प्रशासनाकडे उपलब्ध नसल्यामुळे येथील नागरिकांची घरे किंवा रिकाम्या फ्लॅटची विक्री किंवा खरेदी करताना मोठी अडचण येत आहे. या मालमत्तेची विक्री किंवा खरेदी व्यवहार रितसर करण्याकरिता गावठाणाची आखिव पत्रिका उपलब्ध करून देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते लिमेश माणूसमारे यांनी केली आहे.
प्रशासनाकडे या गावठाणाची आखिव पत्रिका नसल्याने घर किंवा मोकळ्या जागेच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना नोटरी करावी लागते. पर्याय म्हणून नोटरी केल्यानंतरही संबंधित व्यवहाराबद्दलच्या फेरफाराची नोंद शासकीय दस्तऐवजात होत नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. ही समस्या अत्यंत गंभीर असून, याकडे प्रशासनाने, लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन ही समस्या सोडवावी, अशी मागणी माणूसमारे यांनी केली आहे.