सिंदेवाहीतील हिरकणी कक्ष बंद अवस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 05:00 IST2020-08-11T05:00:00+5:302020-08-11T05:00:50+5:30

तालुक्यात सरकारी व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नोकरदार महिलांची संख्या शंभरच्यावर आहे. परंतु, तिथे महिलांसाठी पूरक सुविधा नाहीत. परिणामी महिलांना गैरसोयीला समोरे जावे लागत आहे. महिलांना आपल्या बाळांना योग्य वेळी स्तनपान करता यावे, यासाठी हिरकणी कक्षाची संकल्पना पुढे आली.

The diamond chamber in Sindevahi is closed | सिंदेवाहीतील हिरकणी कक्ष बंद अवस्थेत

सिंदेवाहीतील हिरकणी कक्ष बंद अवस्थेत

ठळक मुद्देमहिलांची गैरसोय : प्रशासनाचे कक्षाकडे दुर्लक्ष

राकेश बोरकुंडवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदेवाही : नोकरी व्यवसाय करणाऱ्या महिलांना आपल्या बाळाला योग्य प्रमाणात स्तनपान देता यावे, यासाठी सुरु करण्यात आलेले हिरकणी कक्ष बंद असल्याने महिलावर्गाची मोठी पंचायत होत आहे. सिंदेवाहीतील बसस्थानक परिसरातील हिरकणी कक्ष बंद आहे. तर अनेक कार्यालयच या कक्षाची स्थापनाच करण्यात आले नसल्याचे वास्तव आहे.
तालुक्यात सरकारी व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नोकरदार महिलांची संख्या शंभरच्यावर आहे. परंतु, तिथे महिलांसाठी पूरक सुविधा नाहीत. परिणामी महिलांना गैरसोयीला समोरे जावे लागत आहे. महिलांना आपल्या बाळांना योग्य वेळी स्तनपान करता यावे, यासाठी हिरकणी कक्षाची संकल्पना पुढे आली. सन २०१२ रोजी शासनाने जाहीर केलेल्या धोरणानुसार ६० बाय ६० जागेचे महिलांसाठी स्वतंत्र हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आले. त्या अनुषंगाने येथील बसस्थानक परिसरात तसेच सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली.
मात्र हे दोन्ही कक्ष बंद अवस्थेत आहे. तसेच अनेक शासकीय कार्यालयात या कक्षाची स्थापनाच करण्यात आली नाही. परिणामी महिलांची मोठी पंचायत होत आहे. त्यामुळे हे कक्ष पुन्हा सुरु करावे, अशी मागणी आहे.

बाळाच्या आयुष्यातील पहिले तीन वर्ष अतिशय महत्त्वाचे असल्याने त्याच्या शारीरिक व बौद्धीक विकासासाठी त्याला वेळोवेळी स्तनदान मिळणे आवश्यक असते. म्हणून प्रत्येक शासकीय कार्यालयात हिरकणी कक्ष असणे काळाची गरज आहे.
- डॉ. आर. एस. मानकर
वैद्यकीय अधिकारी

Web Title: The diamond chamber in Sindevahi is closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.