जिल्हा स्वच्छतेसाठी कुटुंबाशी संवाद

By Admin | Updated: August 22, 2016 01:51 IST2016-08-22T01:51:05+5:302016-08-22T01:51:05+5:30

स्वच्छ भारत मिशन जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावात स्वच्छतेची लोकचळवळ व्हावी,

Dialogue with family for cleanliness | जिल्हा स्वच्छतेसाठी कुटुंबाशी संवाद

जिल्हा स्वच्छतेसाठी कुटुंबाशी संवाद

२२ आॅगस्ट ते २ आॅक्टोबर : पदाधिकारी अधिकारी कर्मचारी होणार सहभागी
चंद्रपूर : स्वच्छ भारत मिशन जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावात स्वच्छतेची लोकचळवळ व्हावी, यासाठी २२ आॅगस्ट ते २ आॅक्टोबर २०१६ या कालावधीत कुटुंबस्तर संवाद अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाची सुरुवात २२ आॅगस्टला मूल तालुक्यातील डोंगरगाव येथे जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरुनुले व मुख्य कार्यकारी अधिकारी एम.डी. सिंह यांच्या हस्ते होणार आहे.
राज्यस्तरावरुन राज्यात कुटुंबस्तर संवाद अभियान राबवून शाश्वत्य गृहभेटींचा कार्यक्रम आखण्याच्या सुचना प्रत्येक जिल्हा परिषदला निर्गमित झाल्या आहेत. या अभियाना अंतर्गत भेटी दरम्यान कुटुंबस्तरावर शौचालयाचे महत्त्व पटवून देणे, शौचालयाचा वापर हा संस्कृती आणि सामाजिक प्रतिष्ठेचे लक्षण असून ही जाणीव करून देणे, उघड्यावरची शौचविधीची प्रथा हद्दपार करण्यासाठी या अभियानाद्वारे गावागावात लोकचळवळ उभी करून शाश्वत स्वच्छता व आरोग्यदायी वातावरण निर्माण करायचे आहे.
या अभियानात सन २०१६-१७ या वर्षात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत २७३ ग्रामपंचायती, चार तालुके ब्रह्मपुरी, मूल, पोंभूर्णा व चंद्रपूर पूर्णत: हागणदारी मुक्त करण्याचे ठरविण्यात आले आहे.
गृहभेटीचा उपक्रम याच ग्रामपंचायतीमध्ये प्रामुख्याने राबविण्यात येणार आहे. अभियानात जिल्हा परिषदेच्या विविध विभाग, सर्व गटविकास अधिकारी, प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी, शिक्षण, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामसेवक, जिल्हा, पंचायत समिती, ग्रामस्तरावरील सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी कुटुंबस्तर संवाद अभियानात सहभागी होऊन जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या स्वच्छतेच्या चळवळीचा भाग बनविण्यात येईल. (प्रतिनिधी)

४५ हजार घरांना भेटी
जिल्ह्यात ४५ हजार घरांना भेटी दिल्या जाणार आहे. या अभियानात ग्रामीण पाणी पुरवठा, शिक्षण आरोग्य, महिला व बालकल्याण, पंचायत, कृषी, नरेगा, एमएसआरएलएम या विभागांच्या समन्वयातून राबविण्यात येणार आहे. हे अभियान जिल्हा, तालुका ग्रामस्तरावरील लोकप्रतिनिधी, विविध शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था, खासगी उद्योजक इत्यादी घटकांना सहभागी करण्यात येणार व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर या अभियानाद्वारा स्वच्छतेची चळवळ निर्माण करून गृहभेटीतन शाश्वत जनसंवाद घडवून आणण्यात येणार आहे.

Web Title: Dialogue with family for cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.