राजुरा येथे संवाद व बैठक कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:26 IST2021-03-08T04:26:31+5:302021-03-08T04:26:31+5:30

राजुरा : येथे चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने माझे कार्यक्षेत्र-माझी जबाबदारी ही मोहीम व्यापक स्वरूपात राबविण्यासाठी जिल्हाधिकारी अजय ...

Dialogue and meeting workshop at Rajura | राजुरा येथे संवाद व बैठक कार्यशाळा

राजुरा येथे संवाद व बैठक कार्यशाळा

राजुरा : येथे चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने माझे कार्यक्षेत्र-माझी जबाबदारी ही मोहीम व्यापक स्वरूपात राबविण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली सीईओ राहुल कर्डीले यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळा पार पडली.

यावेळी नगराध्यक्ष अरुण धोटे, मंगेश गुरनुले, तहसीलदार हरीश गाडे, राजा पवार, मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, चंद्रशेखर बहादुरे, वैशाली सटाले, कुंदा जेनेकर, रामदास पुसाम तसेच नगर परिषद क्षेत्रातील नगरसेवक आणि तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच यांची उपस्थिती होती. अजय गुल्हाने यांनी मास्कचा वापर व शारीरिक अंतर याबाबत कोणीही निष्काळजीपणा करू नये तसेच शासन निर्देशाचे सर्वांनी काटेकोर पालन करण्यासाठी काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे संचालन रत्नाकर भेंडे यांनी केले तर आभार नरेंद्र पेटकर यांनी मानले. या संवाद व बैठक कार्यशाळेसाठी साहेबराव पवार, अमित महाजनवार, रमेश चुन्ने, संजय हेडाऊ, श्रीराम मेश्राम, मुसा शेख, रिता देरकर, ज्योती गुरनुले, राकेश रामटेके, राहुल वंजारी यांनी सहकार्य केले.

Web Title: Dialogue and meeting workshop at Rajura